Pune : धक्कादायक, पुण्यात दररोज तब्बल 900 वाहनांची पडते भर

Pune Traffic
Pune TrafficTendernama

पुणे, ता. २२ : एकीकडे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उग्र रूप धारण करीत असतानाच त्याला कारणीभूत ठरणारी वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वेगाने वाढते आहे. मागच्या आर्थिक वर्षात सुमारे साडेतीन लाख नवीन वाहनांची खरेदी झाली. त्यामुळे दररोज तब्बल ९०० नव्या वाहनांची भर पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Traffic Jam News)

Pune Traffic
Pune : रंगरंगोटीच्या नावाखाली सुरू असलेली पुणेकरांची फसवणूक बंद करा!

पुण्यात वाहतुकीचा वेग दिवसेंदिवस कमी होत आहे. एका सर्वेक्षणानुसार पुण्यात वाहतुकीचा सरासरी वेग ताशी १९ किलोमीटर आहे. तर दुसरीकडे वाहनवाढीचा वेग मात्र सुस्साट आहे. शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात असले तरीही वाहन वाढीला ‘ब्रेक’ लागत नाही. शहरात सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय असले तरीही नागरिकांचा ओढा खासगी वाहनांकडेच आहे.

परिणामी वाहनांच्या संख्येत रोजच वाढ होत आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान पुण्यात ३ लाख २८ हजार ०६६ वाहनांची नोंद पुणे आरटीओकडे झाली आहे. एका दिवसाचा विचार केला, तर रोज सुमारे ९०० वाहनांची खरेदी झाली आहे. यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे.

Pune Traffic
Nashik : स्वखर्चाने गाळ खोदून वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा नवा निर्णय

वाहने वाढल्याचे परिणाम :
१. वाहतूक कोंडीची समस्या तीव्र
२. प्रदूषणात वाढ
३. अपघातांच्या प्रमाणात वाढ.
४. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मारक.
५. वाहतुकीची गती मंदावते.

७२ लाख : पुणे-पिंपरीत दररोज रस्त्यांवर धावणारी वाहने
३ लाख : दररोज ये-जा करणारी वाहने
७५ लाख : दररोज धावणारी एकूण वाहने

Pune Traffic
Nashik ZP : उपकराच्या वसुलीसाठी झेडपी करणार राज्य सरकरकडे तक्रार

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात वाहनांची खरेदी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांनादेखील हळूहळू मागणी वाढत आहे.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे

पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आहे. परवडणारी, शाश्‍वत आणि विश्‍वासार्ह सार्वजनिक वाहतूक नसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. पुण्यात मेट्रो सुरू झाली असली तरीही त्याचा वापर मर्यादित क्षेत्रांपुरता आहे. ‘पीएमपी’ची व्यवस्था बेभरवशाची आहे. त्यावर अवलंबून राहता येत नाही.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com