World Economic Forum : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट; सव्वा सहा लाख कोटींचे एमओयू

World Economic Forum
World Economic ForumTendernama
Published on

दावोस (Davos) : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. यात एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे.

World Economic Forum
Devendra Fadnavis : CM फडणवीस इन अ‍ॅक्शन; अ‍ॅम्ब्युलन्स महाघोटाळा प्रकरणी काय दिले आदेश?

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल ‘जेएसडब्ल्यू’चे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. हा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना जिंदाल म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

World Economic Forum
CM Devendra Fadnavis यंदा पुन्हा वाजविणार का महाराष्ट्राचा डंका?

दरम्यान, दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

World Economic Forum
Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता लोडशेडिंगची चिंता मिटली; कारण?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदल्या दिवशी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवॉ पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली. शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

World Economic Forum
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ताशी ‘इतक्या’ किलोमीटर वेगाने धावणार पहिली बुलेट ट्रेन

फ्युएलची पुण्यात संस्था -
यात एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

झालेले सामंजस्य करार -

1) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली


2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी



3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200



4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर



5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर



6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली



7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर



8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड



9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे



10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर



11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर



12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर



13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर


14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर



15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे





16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000



17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे



18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000



19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर



20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com