Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता लोडशेडिंगची चिंता मिटली; कारण?

mseb
msebTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई शहर व उपनगराच्या वीजमागणीत सातत्याने वाढ होत असताना त्या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १ चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून (महापारेषण) अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केले आहे.

mseb
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलल्याने शेतकऱ्यांकडून...

५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत नुकतेच हे काम पूर्ण झाले. यामुळे वाहिनी क्र. १ आणि वाहिनी क्र. २ या दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावॅटऐवजी ४ हजार २०० मेगावॅट इतक्या विजेचे आता वहन करणे शक्य होणार आहे.

या वाहिनीचे यापूर्वीच २७ कि.मी.चे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित २३ कि.मी.चे काम महापारेषणने युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. या वाहिनीच्या कामात रेल्वे, हायवे व उच्च विदयुत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन तसेच ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यासारखी मोठी आव्हाने होती.

mseb
शेती महामंडळाच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्टसाठी DPR

परंतु, या सर्व अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतीशीलता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून २३ कि.मी. चे वरील काम तातडीने पूर्ण केले.

या कामामुळे ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-१ च्या क्षमतेत आमुलाग्र बदल होऊन पूर्वीच्या १००० मेगावॅटऐवजी २१०० मेगावॅटपर्यंत विजेचे वहन करणे शक्य होणार आहे. यापूर्वीही कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-२ च्या क्षमतेत वाढ झाल्याने दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावॅटऐवजी ४ हजार २०० मेगावॅट इतक्या विजेचे वहन करणे आता शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com