Maharashtra : 6 कंत्राटदारांना भाजपने महाराष्ट्र विकला! कोणी केला आरोप?

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit PawarTendernama

सोलापूर (Solapur) : भारतीय जनता पक्षाने (BJP) आणि सरकारने सहा बड्या कंत्राटदारांना महाराष्ट्र विकला असल्याची टीकास्त्र काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी डागले.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
राज्याच्या वित्त विभागाचा अजब न्याय; आदेश झुगारणाऱ्यांना बक्षिसी अन् नियम पाळणाऱ्यांना शिक्षा

पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. या वेळी प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Nashik : नाशिककरांना लवकरच मिळणार खुशखबर! केंद्रीय पथकाकडून पाहणी

शिक्षकांच्या कार्यक्रमाला मी गेले असता मला त्यांनी सांगितले की कदाचित शिक्षकांची ही आमची शेवटची पिढी असेल. हे वाक्य ऐकून मला धक्का बसला, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

राज्यातल्या सर्वसामान्य-गोरगरीब जनतेचा आरक्षणाचा हक्क हिसकावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच भाजपने आणि राज्य सरकारने बड्या सहा कंत्राटदारांना महाराष्ट्र विकला आहे. सरकारच्या अशा निर्णयामुळे बिंदुनामावली रद्द होणार आहे. आरक्षण रद्द होणार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Pune : राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती; 'या' 23 जिल्ह्यांचा समावेश

सरकारने रचलेले हे मोठे षडयंत्र आहे. या विरोधात आम्ही मैदानात उतरलो आहोत. त्यांना आम्ही महाराष्ट्र कंत्राटदारांच्या घशात घालू देणार नाही, असे वक्तव्य शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com