Hoarding Scam
Hoarding ScamTendernama

Pune : झोपलेल्या महापालिका प्रशासनाला आली जाग! नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

PMC : महापालिकेच्या पथकाने अनधिकृत फलक, बॅनर काढल्यानंतर काही दिवसांतच त्याचठिकाणी पुन्हा फलक लावले जात आहेत.
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिका (PMC) प्रशासनाकडून थंडावलेली फलकबाजीविरुद्धची कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

यात अनधिकृत होर्डिंग, फलक व बॅनर तत्काळ काढून टाकण्याबरोबरच प्रशासनाने दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे फलकबाजीची हौस असणाऱ्यांच्या खिशाला फटका बसण्यासह कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची वेळ येणार आहे.

Hoarding Scam
'या' प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड येत्या तीन दशकांमध्ये पुण्याला मागे टाकणार

महापालिकेच्या पथकाने अनधिकृत फलक, बॅनर काढल्यानंतर काही दिवसांतच त्याचठिकाणी पुन्हा फलक लावले जात आहेत. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर या कारवाईला वेग आला आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या पथकांनी शहरात अनधिकृत होर्डिंग, फलक व बॅनरविरुद्ध नगर रस्ता, औंध, रामटेकडी, वानवडी भागामध्ये कारवाई केली. तसेच गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांना पत्रही दिले आहे. काही जणांविरुद्ध थेट गुन्हे दाखल केले आहेत.

Hoarding Scam
पुण्याहून कोल्हापूरला प्रवास करताय? आता 'हा' नवा मार्ग ठरणार सुपरफास्ट

फलकबाजांबरोबर साटेलोटे !
आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत फलकांवर कारवाईला सुरवात केली आहे. मात्र क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई झालेली नाही. अनधिकृत फलक लावल्यानंतर तो जीर्ण होऊन त्याचा सांगाडा जाग्यावरच राहतो. तरीही, क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांचे त्याकडे लक्ष जात नाही.

नागरीकांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच संबंधित तक्रारदाराला धमक्‍या दिल्या जातात. अनधिकृत फलक, बॅनर लावणारे व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.

Hoarding Scam
Mumbai : बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने दिली Good News; आता कोठूनही...

शहरातील कोणत्याही चौकात १० ते २० अनधिकृत फलक, बॅनर दिसतात. पण, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ते का दिसत नाहीत? या प्रकाराला कोण अभय देते? याची दखल घेऊन महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी.
- नितीन खेडकर, नोकरदार

अनधिकृत होर्डिंग, फलक व बॅनरकडे वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ही कारवाई यापुढेही कायम राहील.
- प्रशांत ठोंबरे, प्रमुख, आकाशचिन्ह विभाग, महापालिका

Hoarding Scam
वीस वर्षांपासून खड्ड्यांत गेलेल्या सावळीविहीर ते अहिल्यानगर रस्त्याचा फेरा कधी संपणार

अशी झाली कारवाई
२ हजार ५२ : अनधिकृत फलक, बॅनर

१ लाख ३६ हजार : वसुल केलेला दंड

१५ : फलकांबाबत पोलिसांना पत्र

२ : गुन्हे दाखल

Tendernama
www.tendernama.com