बीडबायपास संग्रामनगर पुलाचे डिझाईन सदोषच; आंदोलनाचा इशारा

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : बीडबायपास मार्गावर उड्डाणपुलाची उंची कमी असल्याची सातारा-देवळाईकरांनी ओरड करताच पुलाचे बांधकाम चुकल्याची अफवा म्हणत बांधकाम विभागाने येथील सव्वालाख लोकांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. सद्यस्थितीतील जमीन स्तरापासून पुलाची उंची ३.८ मीटर असल्याने अवजड वाहने पुलाला धडका मारत असल्याचे दिसताच सातारा-देवळाई आणि बीडबायपासवासीयांनी समाजमाध्यमांवर टिकास्त्र सोडले. त्यावर बांधकाम विभागाने सदोष पुलाचे डिझाईन झाकण्यासाठी पुलाखालुन १.७ मीटर खोदकाम सुरू केले व तिथे शहरात पहिलाच व्हेईक्युलर अंडरपास बांधण्यात आल्याचा दावा केला. मात्र, पाच ते सहा फूट खोदकाम केल्यानंतर देखील जडवाहने पुलाखालुन जाताना वाहनांचा खोळंबा होत असल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे.

Aurangabad
'गोदावरी'च्या प्रदूषणमुक्तीसाठी नाशकात आता 'मिठी पॅटर्न'

बीडबायपास संग्रामनगर उड्डाणपुलाखाली खोदकामामुळे दरम्यानच्या या भुयारी मार्गात पाणी साचून वाहनांचा खोळंबा होऊन कोंडी होणार असल्याची शंका घेत येथील हजारो नागरिकांनी पुलाच्या उंचीबाबत व सदर पुलाचे काम सदोष असल्याचा प्रश्न बांधकाम विभागापुढे उपस्थित केला होता. त्यानंतर पुलाच्या उंची आणि सदोष बांधकामाबाबत काही लोक समाजमाध्यमांवर अफवा पसरवून संभ्रम निर्माण करत असल्याचे जाहीर करत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थेट खोदकाम करून पुलाखालुन भुयारी मार्गापासून पुलाची उंची साडेपाच मीटर असल्याचा दावा करण्यात आला व सद्यस्थितीत जमीनस्तरापासून पुलाची उंची ३.८ मीटर व त्याखालुन १.७ मीटर खोल भुयारी मार्ग असल्याचे सांगत भुयारी मार्गापासून ते पुलाची साडेपाच मीटर उंची असल्याचा खुलासा बांधकाम विभागाने केला. सद्यस्थितीत अद्यापही भुयारी मार्गासाठी पुलाखाली दोन्ही बाजुने खोदकाम सुरू आहे.

Aurangabad
PUNE: मर्जीतील ठेकेदारासाठी माननियांचा हट्ट भोवला अन् आली नामुष्की

असे असले तरी या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी भविष्यात वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे, यावर नागरिक आजही ठाम आहेत. पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा या बीडबायपास राष्ट्रीय महामार्गाच्या संग्रामनगर चौकाच्या अलीकडे आमदार रोडचा संपर्क तोडल्याने दरम्यानच्या भुयारी मार्गाच्या पुलाची ही समस्या अधिक भेडसावणार आहे. आमदाररोड ते बायपास येथे एटरंन्स देण्यात यावा, जेणेकरून चुकीच्या दिशेने प्रवास होणार नाहीत व अपघाताची खंडित मालिका पुन्हा सुरू होणार नाही, अशी नागरिकांची मागणी आहे. पुलाखाली दोन्ही बाजुने बशीचा आकार अर्थात सखल भाग केल्याने या भुयारी मार्गात पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचेल. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागणार यात कुठलीही अफवा आणि संभ्रम नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. या रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी असणाऱ्या जी. एन. आय. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. या कंपनीने संबंधित पुलाची उंची वाढवून ही समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी दक्षिणेकडून उत्तरेला असलेल्या दर्गा उड्डाणपुलाखालील रेल्वे पट्रीच्या दिशेने नाल्यात पाणी सोडण्यासाठी भुमिगत पावसाळी गटार तयार करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहे.

Aurangabad
विकासकामांना स्थगिती का? शिंदे-फडणवीस सरकारला 20 तारखेची मुदत

मुळात ज्याठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जात आहे. तिथुन पूर्वीचा जमीनस्तर उंच आणि सुपासारखा होता. संग्रामनगर चौकातील साचलेले पाणी नैसर्गिकरित्या दर्गा उड्डाणपुलाच्या उतारावरून नाल्यात जात होते. विशेष म्हणजे या पाण्याचा निचरा करण्यासाठी दर्गा पुलाचे बांधकाम करताना उताराच्या दोन्ही बाजूने भुमिगत ड्रेन तयार केलेली आहे. त्यावर फुटपाथ बांधलेला आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहनचालकांना कुठलाही त्रास होणार नाही असे विभागाचे मत आहे. मात्र प्रतिनिधीने आज पुलाखाली उभे राहुन तब्बल तीन तास सर्वेक्षण केले असता, भुयारी मार्गापासून पुलाची उंची साडेपाच मीटर केल्यानंतर देखील जडवाहने अडखळत असल्याचे निदर्शनास आले. वेगाने येणाऱ्या जडवाहनाला पुलाखालुन जाताना आधी थांबा घ्यावा लागतो. त्यानंतर पहिल्या गेटवर वाहन जोड रस्त्याला आणावे लागत आहे. यात चढावरून वाहन चढत नसल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्त करत पुलाची उंची वाढवने हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सुचवले. त्यात भुयारी मार्गावर काँक्रिट रस्त्यांची उंची वाढल्यास जडवाहने पुलाखालून कशी पास होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सदोष उड्डाणपुलाच्या डिझाईनवर पडदा पाडण्यासाठी कारभाऱ्यांनी व्हेईक्युलर अंडरपासच्या नावाखाली उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गासाठी जमीनस्तरापासून पुलाच्या खाली दक्षिणोत्तर आणि पूर्व-पश्चिम पावसाळी पाण्याचा ढाळ काढण्यासाठी यु आकाराचा सखल भाग तयार केला आहे. यात दोन्ही बाजुच्या लेअर खाली वर झाल्याने आमदार रस्त्याचा संपर्क तुटला. यामुळे भुयारी मार्ग तयार होण्याआधीच येथे वाहतूक ठप्प होत आहे. यात सातारा गावाचा काही काळ संपर्क तुटेल असे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात पुराचा लोंढा थेट एकदाच ड्रेनमध्ये जाणार नाही. जेव्हा काही प्रमाणात पाणी ओसरेल तेव्हा जोखीम पत्करून वाहनचालकांना ये-जा करावी लागणार आहे.

Aurangabad
नाशिक झेडपीला 119 कोटी खर्चासाठी आचारसंहितेतून हवी शिथिलता

सातारा-देवळाई या पंचक्रोशीचा मनपात समावेश होण्यापूर्वीच अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिल्याने प्रामुख्याने सरकार दरबारी काम करणारे अधिकारी, कारखान्यात काम करणारे कामगार, उद्योजक येथे वास्तव्यास आले. त्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथे राहण्यास आलेल्या नागरिकांना आमदार रोडवरून थेट बायपासवरील पंक्चर दुभाजकातून देवळाई रोडकडे सहज वळण घेता येत होते. आता हा मार्ग बंद झाल्याने या सर्वांना या पुलांचा वापर करून वळन घेऊन पुढे जावे लागणार आहे. मात्र, या समस्येमुळे आत्ताच येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने सर्वांनाच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना गंभीरता नाही. यावर कायमचा तोडगा काढून भुयारी मार्गाचे काम बंद करून रस्ते पूर्ववत करावेत, आमदाररोडसमोरून एन्ट्री करावी, संग्रामनगर चौकातील फुलाची उंची वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. सातारा व बीडबाय येथील भुयारी मार्गाच्या पुलाजवळ रोजच वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे. भुयारी मार्गाचे हे काम त्वरित बंद करावे यासाठी सातारा-देवळाई संघर्ष समिती, जनसेवा महिला समिती, जनसेवा नागरी कृती समिती, सातारा - देव॓ळाई खान्देश मित्र मंडळ यांच्यावतीने बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन दिले जाणार आहे.

Aurangabad
मुंबई महापालिकेचे 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' पुरवठ्यासाठी टेंडर

काय म्हणाले नागरिक

नागरीकरणामुळे या भागात २० वर्षांत प्रचंड मोठा बदल झाला, शहरीकरण झाले. त्यामुळे कुठलाही अडथळा नसलेल्या जागी असा जीवघेणा भुयारी मार्गाची उठाठेव  करण्यापेक्षा पुलांची उंची आधीच्या जमीनस्तरापासून साडेपाच मीटर करावी. 

- बद्रीनाथ थोरात

भविष्यात अडचण होणारच आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, महापालिका , पोलीस आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्यांनी स्वतः येऊन एकत्रित पाहणी करावी आणि तोडगा काढावा.

- ॲड. शिवराज कडु पाटील 

पुलाचे सदोष डिझाईन हेच खरे कारण झाकण्यासाठी अधिकार्यांनी भुयारी मार्गाची शक्कल लढवली आहे. यासाठी आम्ही समाजमाध्यमांवर आवाज उठवला.  वारंवार पाठपुरावा केला़ मात्र बांधकाम शिभागाने याकडे नेहमीच काणाडोळा केला़. आता पावसाळ्यात ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. त्यामुळे हे काम त्वरित बंद  करण्यात यावे.

- आबासाहेब देशमुख

सिडकोतील जळगाव टी पाॅईंट ते सेव्हनहील या दोन्ही उड्डाणपुलांच्या उतारात केवळ पाचशे मीटर अंतर असताना या दोन्ही पुलांच्या लांबीत बदल नाही. प्रत्येक जोड रस्त्याला इंटरंन्स आहे. पुलांची उंची देखील समान आहे. इकडे संग्रामनगर ते एमआयटी चौक हे अंतर सव्वा किमी. असताना येथे कुठलाही अडथळा नव्हता. अनिकाऱ्यांनी दिलेले प्रत्येक कारण लेखी स्वरूपात कार्यालयाच्या सहिशिक्क्यासह द्यावे. दर्गा उड्डाणपुलाबाबत दिलेले तांत्रिक कारण देखील चुकीचे आहे. आधीपासूनच दर्गापुलाचा उतार आणि संग्रामनगर चौक एकाच रेषेत होता. केवळ झालेली चुक झाकण्यासाठी हा प्रकार केलेला आहे. आता ठेकेदाराला आर्थिक फायदा पोहोचावा आणि स्वतः केलेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा हा प्रकार आहे.

- ॲड. सुशिलकुमार कांबळे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com