NDCC Bank Scam : माजी मंत्री सुनील केदारांची आमदारकी होणार रद्द; कारण...

Sunil Kedar
Sunil KedarTendernama

नागपूर (Nagpur) : राज्याचे माजी पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार (Sunil Kedar) मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (NDCC Bank Scam) कोट्यवधी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावास आणि साडेबारा लाखांचा दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. यात एकूण सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली.

Sunil Kedar
Nashik : झेडपीने जलजीवनच्या ठेकेदारांचे 150 कोटी थकवले; 50 टक्के कामे करूनही केवळ 444 कोटींची देयके

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांनी हा निर्णय दिला. घोटाळा झाला त्यावेळी केदार बँकेचे अध्यक्ष होते. एकूण 11 पैकी 9 आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 406 (विश्वासघात), 409 (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), 468 (बनावट दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवज खरे भासविणे), 120-ब (कट रचणे) व 34 (समान उद्देश) हे दोषारोप निश्चित करून हा खटला चालविण्यात आला.

संबंधित आरोपींमध्ये सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबनीस सुरेश दामोदर पेशकर (नागपूर), रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद), महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार (कलकत्ता) यांचा समावेश आहे. इतर दोन आरोपींपैकी रोखे दलाल संजय हरिराम अग्रवाल यांच्याविरुद्धच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर कानन वसंत मेवावाला फरार आहे. केदारांकडून ऍड. देवेन चौहान यांनी युक्तिवाद केला. तर, राज्य सरकारतर्फे नाशिकचे जिल्हा सरकारी वकील ऍड अजय मिसाळ यांनी बाजू मांडली.

Sunil Kedar
Mumbai : सरकारने दिली गुड न्यूज! मुंबईतील 'त्या' इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

बँकेचे 150 कोटींचे नुकसान

2001-2002 मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चट्स प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई यांच्याकडून बँकेच्या रकमेतून 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व बँकेची रक्कमही परत केली नाही. ही रक्कम व्याजासह 150 कोटी रुपयांवर गेली आहे.

विविध कारणांमुळे खटला रखडला

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) तत्कालीन उपअधीक्षक किशोर बेले हे या घोटाळ्याचे तपास अधिकारी आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 22 नोव्हेंबर 2002 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हा खटला तेव्हापासून प्रलंबित होता. विविध कारणांमुळे खटल्यावरील सुनावर्णी तातडीने पूर्ण होऊ शकली नाही.

Sunil Kedar
Nashik : दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी वितरणात 'समाजकल्याण'ची मनमानी; चेहरे बघून दिला निधी?

तीन आरोपी निर्दोष

खटला चालविण्यात आलेल्या नऊ आरोपींपैकी सुनिल केदार यांच्यासह एकूण आठ आरोपी न्यायालयात हजर होते. एक आरोपी नंदकिशोर त्रिवेदी वैद्यकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकला नाही. तो व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित होता. सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठ, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच, महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार आणि सुरेश पेशकर या तीन आरोपींची निर्दोष सुटका झाली.

तर आमदारकी होणार रद्द

लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आमदार किंवा खासदारांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात येत. त्यामुळे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले सुनील केदार यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्याने त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. केवळ वरिष्ठ न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यास सदस्यत्व मिळू शकेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com