Nagpur : हजारो कोटींचे अंबाझरी गार्डन विकले 99 रूपयांत?

Nagpur
NagpurTenderanam

नागपूर (Nagpur) : नागपूर शहराला प्राणवायूचा पुरवठा करणारे, नागपुरातील प्रत्येकासाठी सहलीचे ठिकाण, मुलांना खेळण्याचे ठिकाण, वरिष्ट नागरिकांचे सकाळ संध्याकाळी फिरण्याचे ठिकाण म्हणून आजवर नागपूरची शान असलेले हक्काचे अंबाझरी उद्यान एमटीडीसी (MTDC) च्या माध्यमातून खाजगी व्यावसायिकांना विकण्याचे काम नागपुरातील प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातील सरकामधील पुढाऱ्यांनी केले असल्याचे आरोप केले जात आहे.

Nagpur
खडी घोटाळा? 'शिंदेंच्या माणसाला खडीपुरवठ्याचे काम देण्यासाठीच...'

44 एकर मधील भव्य असे उद्यान आता खाजगी गरुडा अम्यूजमेंट पार्क प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून मोठमोठ्या इमारती, रिसोर्ट, विश्रामगृह बांधून करोडपती लोकांसाठी पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. एकूणच 44 एकर जमीन फुकटात म्हणजे एक रुपया वर्षाप्रमाणे 99 वर्षांसाठी म्हणजेच 99 रुपयात विकण्याचा कारभार महसूल विभागाने केला आहे. याबाबत आता पर्यंत झालेले सर्व करार रद्द करावेत आणि हे उद्यान पुन्हा नागपूरकरांसाठी पूर्ववत चालू ठेवावे, सोबतच येथे असलेले डॉ आंबेडकर भवन सुद्धा पुन्हा बांधून जनतेच्या सेवत हस्तांतरित करावे अशी मागणी आम आदमी पार्टी च्या शिष्टमंडळाने केली आहे. यासाठी त्यांनी विभागीय आयुक्त बिदरी यांना निवेदन दिले. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, विरोधी पक्ष नेता अजित पवार, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.

Nagpur
Nagpur : आता अत्याधुनिक मशीन तयार करणार रेल्वे ट्रॅक

ज्यात शासन निर्णय क्र.जमीन 2015/प्र.क्र.299/ज-8 दि.21.07.2017 आणि शासन निर्णय क्र. जमीन 2015/प्र.क्र.299/ज-8 दि.19.08.2019 रद्द करण्यात यावेत. एमटीडीसी (MTDC) व विकासक यांच्यात झालेला करार रद्द करण्यात यावा. एमटीडीसी चे बेजबाबदार अधिकाऱ्यावर व त्यांच्या विकासकांवर अवैधरित्या डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याबाबत त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अंबाझरी उद्यानाचा ताबा त्वरित महानगर पालिकेला परत करुन पूर्णवेळ जनतेसाठी खूले करून द्यावे,  शासनाच्या निधीतून एक भव्य डॉ. आंबेडकर सास्कृतिक भवन निर्माण करण्यात यावे. एकूणच संपूर्ण प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची न्यायालयीन चैकशी करून या गैरव्यवहारात लिप्त असणाऱ्या प्रशासकीय अधिकारऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन करणार असल्याची चेतावनी आम आदमी पार्टी शिष्टमंडळाने दिली आहे.

Nagpur
Nashik ZP : यंदा विक्रमी 95 टक्के निधी खर्च होणार?

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ यांनी ही जमीन स्वता विकसीत न करता गरूडा अम्युजमेंट्स पार्क (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड ला 99 वर्षांकरीता मात्र साडे सहा रुपये वार्षिक फुटाच्या दराने भाडेपट्टयावर दिलेली आहे. एका खाजगी कंपनीला नफा कमावण्यासाठी नाममात्र दरावर जमीन उपलब्ध करून देणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शासनाला किंवा नागपूरच्या जनमाणसाला या प्रकल्पापासून काहीही लाभ होणार नाही. या प्रकल्पाचे 13 एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाला नागपूर च्या स्थानिक नेत्यांच्या सुद्धा विरोध आहे. आमदार विकास ठाकरे, माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी अंबाझरी पार्क साठी अनेकवेळा आंदोलने केली आणि आता आम आदमी पार्टी या प्रकल्पाचा विरोध करत समोर आली आहे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com