Nagpur : आता अत्याधुनिक मशीन तयार करणार रेल्वे ट्रॅक

Railway Track
Railway TrackTendernama

नागपूर (Nagpur) : रेल्वे रुळ टाकण्यासाठी आता नवीन अत्याधुनिक यंत्रे वापरली जात आहेत. याअंतर्गत आता नागपूर-नागभीड रेल्वे ट्रैक टाकण्याचे काम एनटीसी (न्यू ट्रॅक कन्स्ट्रक्शन मशिन) द्वारे केले जाणार आहे. 25 लाख रुपयांच्या या मशिनसाठी निर्धारित वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याचा दावा अधिकारी करत आहेत.

Railway Track
Thane महापालिकेचा ठेकेदारांना दणका; नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी...

एक वर्षात काम पूर्ण होणार

आतापर्यंत रेल्वे रुळ टाकण्याचे काम गँगमन करत होते, मात्र आता हे रुळ मशिनने टाकले जाणार आहेत. हे काम महारेलला देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता महारेल हे काम मशीनद्वारे करणार आहे आणि महारेल ने नागभीड लाइनसाठी एनटीसी मशीन खरेदी केले आहे. आणि त्यासाठी फक्त एकच ऑपरेटर आवश्यक राहणार आहे. महारेलने 25 लाख रुपयांचे एनटीसी मशीन मागवले आहे. सुमारे 10 मीटर लांबीचे हे यंत्र स्वतःच ट्रॅक टाकण्याचे काम करते. त्यासाठी फक्त ऑपरेटरची आवश्यकता असते. मुख्य म्हणजे या मशिनद्वारे एकावेळी 25 मीटरचा ट्रॅक टाकता येणार आहे. नागपूर-नागभीड मार्गाची एकूण लांबी 116 किमी आहे. ते प्रत्यक्षात येण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार होता, मात्र मशिनच्या मदतीने हे काम वर्षभरात होणार आहे.

Railway Track
Nashik : झेडपीचा अजब कारभार; नगर जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराला...

नागभीड नॅरोगेजला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याच्या निर्णयास 2013-14 साली मान्यता देण्यात आली. रेल्वेमार्ग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून जात असल्याने वनखात्याने काम अडवून ठेवले होते. आता तिथून रेल्वे एलिवेटेड ट्रॅकवर धावणार आहे. आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) ने काम अगदी सोपे केले  आहे. नागपूर-नागभीड मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या नावाखाली 25 नोव्हेंबर 2019 मध्ये नॅरोगेज गाडी बंद करण्यात आली.

Railway Track
Nagpur : 27 कोटी खर्च करून 'या' तलावाचे वैभव येणार परत

भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून 21 महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र काम करण्याची संथगती पाहता ब्रॉडगेज मार्गाचे काम पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागतील हे निश्चित सांगता येत नाही. तसेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून हा रेल्वेमार्ग जात असल्याने वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गामध्ये बाधा येत होती. त्यामुळे वनखात्याने काम अडवून ठेवले होते. त्यावर उपाय म्हणून रेल्वेने जंगलातील 16 किलोमीटरचे मार्ग उमरेड ते नागभीडदरम्यान येणाऱ्या वन क्षेत्रातून एलिवेटेड अर्थात वरून जाणारा रेल्वे ट्रॅक तयार होणार आहे. हा झोनमधील पहिला एलिवेटेड ट्रॅक ठरेल. मेट्रोप्रमाणे रेल्वेही काही किलोमीटर उन्नत मार्गावर धावू शकणार आहे. यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली. पण वनखात्याचा अडसर दूर होईल आणि वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्गही अबाधित राहू शकणार आहे. नागपूर- नागभीड ब्रॉडगेजचे काम अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आहे. प्रकल्पाची वाढणारी किंमत आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तातडीने काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com