Bhandara : का रखडले 'या' उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम? जबाबदार कोण?

Bhandara
BhandaraTendernama

भंडारा (Bhandara) : साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला 22 महिन्यांचा कालावधी लोटला असलातरी बांधकाम धिम्यागतीने सुरू आहे. 31 मार्च 2024 पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करायचे आहे; मात्र अजूनपर्यंत वेळेवर निधी मिळत नसल्याने बांधकाम रखडले आहे.

Bhandara
Nashik : 1384 ग्रामपंचायतींना लॉटरी; जिल्हा परिषद करणार 6.32 कोटी जमा

यापूर्वी साकोली येथे कुटीर रुग्णालय होते. नंतर त्याला 50 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. आता प्रस्तावित 100 बेडच्या रुग्णालयासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामावर अंदाजपत्रकानुसार 45 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. टेंडर सूचनेनंतर कंत्राटदाराने 20 टक्के कमी दरात बांधकाम करून देण्याचा करारनामा केला आहे. या करारनाम्यानुसार 31 मार्च 2024 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. रुग्णालयाच्या बांधकामाला दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे; मात्र त्याकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याने आता काम रखडले आहे. 

Bhandara
Nashik : 'या' डबलडेकर पुलाचा आराखडा तयार करा; दादा भुसेंनी प्रशासनाला लावले कामाला!

पुढील पाच महिन्यांत रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या कामासाठी कंत्राटदाराला मुदतवाढ व बाजारभावानुसार दरवाढ करून द्यावी लागणार, हे निश्चित आहे; मात्र गत दीड वर्षापासून या कामांसाठी वेळेवर निधी उपलब्ध करून दिला असता तर आता इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाच्या जवळ आले असते. आता केवळ कॉलम उभे दिसत असल्याने रुग्णालयाचे बांधकाम होणार कधी, असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.

Bhandara
सरकारी पदे कंत्राटी तर आमदार, खासदारही कंत्राटी का नाही?; कोणी केला सवाल?

निधी उपलब्ध करून देण्याची गरज

भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या मध्यभागात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साकोली येथे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. महामार्गा- वरील अपघातातील गंभीर जखमींसह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी येथे आरोग्य सेवा घेणे सोयीचे ठरते. प्रस्तावित 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी लाभदायक ठरणार आहेत. त्यासाठी शासनाने वेळेवर निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com