सिंहस्थ कुंभमेळाः त्र्यंबकेश्वरमध्ये प्रयागतीर्थाजवळ 196 एकरांवर साधुग्राम

कोलांबिका देवस्थानच्या २०० एकर जागेचा प्रस्ताव नाकारला; साधुग्रामसाठी १९६ एकर, तर भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी ४४३ एकरांवर होल्डिंग एरिया
Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela 2027 LogoTendernama
Published on

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावरील प्रयागतीर्थाजवळील सुमारे ६३९ एकर जागेपैकी १९६ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारले जाणार असून, उर्वरित ४४३ एकर जागेचा वापर होल्डिंग एरियासाठी केला जाणार आहे. यामुळे साधुग्रामसह घाटांवर होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठीही मोठी जागा उपलब्ध होणार आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Sadhugram: त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामची जागा निश्चितीसाठी विकासक लॉबी कार्यरत?

'टेंडरनामा'ने टाकला होता प्रकाश

नाशिक येथील विस्तारित साधुग्रामसाठी कुंभमेळा प्राधिकरणाने एक हजार एकर जागेवर तात्पुरते भूसंपादन प्रस्तावित केले आहे. मात्र, याविरोधात शेतकरी व जमीनधारक उच्च न्यायालयात गेले असताना कुंभमेळा प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वर येथे साधुग्रामसाठी जागा निश्चित केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील प्रयाग तीर्थाजवळील नवीन घाटालगतच्या २०० एकर जागेवर साधुग्राम उभारले जाणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर पालिकेच्या माध्यमातून कोलांबिका देवस्थानच्या जागेवर साधुग्राम उभारणीचा बिल्डर लॉबीचा प्रयत्न हाणून पाडल्याचे बोलले जात आहे. 'टेंडरनामा'ने कोलांबिका देवस्थानची जागा साधुग्रामसाठी कशी योग्य नाही. मात्र, बिल्डरलॉबी त्यासाठी प्रयत्नशील असल्याचा मुद्दा समोर आणला होता.

Kumbh Mela 2027 Logo
सिंहस्थात होणार 27 हजार कोटींची उलाढाल; कुंभमेळा प्राधिकरणाकडून बचतगट, पथविक्रेत्यांना प्रशिक्षण

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यात नाशिक महापालिकेने साधुग्रामसाठी विकास आराखड्यात आरक्षण टाकलेले आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येक सिंहस्थासाठी जागा बदलली जाते. आगामी सिंहस्थात ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी व त्र्यंबकेश्वर गावाच्या पलिकडे असलेल्या कोलांबिका देवस्थानच्या २०० एकर जागेवर साधुग्राम उभारण्यात यावा, असा ठराव त्र्यंबकेश्वर पालिकेने केला होता. मात्र, त्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ त्र्यंबकेश्वरच्या रिंगरोडने जाण्याचाच पर्याय आहे. त्यातही हा रिंगरोड केवळ सहा मीटर रुंदीचा आहे.

दरम्यान प्राधिकरणने साधुग्रामसाठी जागा ठरवताना घाटांपासून जवळ, चहुबाजूंनी रस्त्यांची जोडणी, तसेच त्या जागेच्या बाजूला होल्डिंग एरियासाठी आणखी जागा उपलब्ध असावी, असे निकष निश्चित केले आहेत. त्या एकाही निकषात ही कोलांबिका देवस्थानची जागा बसत नव्हती. यामुळे प्राधिकरणने आपल्या भूमिकेवर ठाम राहून डोंगर उतारावरील व प्रत्यक्षात केवळ १५० एकर जागाच वापरात येणार असल्याने तो प्रस्ताव स्वीकरला नाही. त्याऐवजी त्र्यंबकेश्व-नाशिक मार्गावरील प्रयागतीर्थाशेजारील जागा साधुग्रामसाठी निश्चित केली आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik: गंगापूर रोडला समांतर रस्त्याला अखेर कुंभमेळा प्राधिकरणची मान्यता; डाव्या कालव्यावरील रस्तावर फुली

ही जागा जवळपास ६३९ एकर आहे. याशिवाय ही जागा त्र्यंबकेश्वरबाहेर उभारण्यात येणा-या नवीन घाटांलगत आहे. यामुळे या जागेवर साधुग्राम उभारण्याबरोबरच घाटांवर स्नानासाठी होल्डिंग एरिया करता येणार आहे. यामुळे घाटांवर स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता येणार आहे. तसेच साधुग्राम लगतही भाविकांना घाटाकडे जाण्यापूर्वी थांबवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे १९६ एकर जागेवर साधुग्राम उभारले जाणार असून उर्वरित ४४३ एकर जागेवर होल्डिंग एरिया केला जाणार आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर येथील घाटांवर गर्दी असल्यास काहीकाळ भाविकांना येथे थांबवता येथे शक्य होणार आहे. याशिवाय सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठे मंडप याच जागेवर उभारले जाणार आहेत.

Kumbh Mela 2027 Logo
Trimbakeshwar Darshan Path: सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार

यामुळे नाकारली कोलांबिकेची जागा
प्रयागतीर्थाशेजारील या जागेवर पावसाळ्यात पाणी साचते, असे कारण देऊन त्या जागेला त्र्यंबकेश्वर पालिकेच्या माध्यमातून विरोध केला जात होता. मात्र, कोलांबिका देवस्थानच्या जागेबाबत काही खासगी व्यक्ती व देवस्थानचे विश्वस्त यांचा वाद उच्चन्यायालयात प्रलंबित असल्याचे समोर आले. त्यातच कोलांबिका देवी-गंगाद्वार ट्रस्टने मागील महिन्यात कुंभमेळा प्राधिकरणाला निवेदन देऊन साधुग्रामसाठी जागा घेतल्यास त्याचा भाडेपट्टा आम्हाला देण्याची मागणी केली होती. यामुळे कायदेशीर पेच टाळण्यासाठी या जागेवर फुली मारल्याचे बोलले जात आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik: कुंभमेळा प्राधिकरणाचाही स्वतंत्र टेंडरसेल
त्र्यंबकेश्वर येथे साधुग्रामसाठी प्रयागतीर्थाशेजारील जागा निश्चित केली आहे. या जागेवर साधुग्रामची उभारणी केली जाईल. तसेच त्र्यंबकेश्वर येथील नवीन घाटांलगत पर्वणीकाळात गर्दी नियोजनासाठी तेथे होल्डिंग एरिया करण्यात येणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण
Kumbh Mela 2027 Logo
Nashik Infra: सिंहस्थाच्या निमित्ताने 'या' 5 रेल्वेस्थानकांचा बदलणार चेहरामोहरा

Key Points

  • ६३९ एकर जागा : प्रयागतीर्थाजवळील जागेची साधुग्रामसाठी निवड,

  • १९६ एकरांवर साधुग्राम : त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम याच क्षेत्रात उभारले जाणार,

  • ४४३ एकर होल्डिंग एरिया : भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी जागेचा वापर,

  • २०० एकरांचा पर्याय : कोलांबिका देवस्थानच्या जागेचा प्रस्ताव स्वीकारला नाही,

  • घाटांजवळील जागा : नवीन घाटांच्या लगत साधुग्राम उभारण्याचे नियोजन,

  • रस्ते जोडणीचा निकष : साधुग्रामसाठी जागा निश्चित करताना प्रमुख निकषांपैकी एक,

  • भाविकांच्या गर्दीचे नियोजन : घाटांवरील गर्दी वाढल्यास होल्डिंग एरियाचा वापर,

  • धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम : सिंहस्थ काळात मोठे मंडप उभारण्याचे नियोजन.

Tendernama
www.tendernama.com