सिंहस्थात होणार 27 हजार कोटींची उलाढाल; कुंभमेळा प्राधिकरणाकडून बचतगट, पथविक्रेत्यांना प्रशिक्षण

Kumbh Mela
Kumbh MelaTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने येणारे भाविक व साधुमहंत यांच्यामुळे सुमारे २७ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. यामुळे या आर्थिक संधीचा लाभ महिला बचत गट, पथविक्रेते आणि स्थानिक सूक्ष्म उद्योजकांना मिळावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राबविलेल्या अनेक (ANEK: Accelerating Nano Enterprises through Kumbh) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत उमेद (UMED) आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत लाभार्थ्यांच्या क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
 

Kumbh Mela
Exclusive: महाराष्ट्रातील व्हीआयपींच्या सुरक्षेशी खेळ! 'ॲरो' कंपनीवर मेहेरबानी कुणाची? अजित पवारांच्या अपघातानंतरही ‘ॲरो’ला अभय

कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला  जातो. मागील वर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात उलाढालीचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळाही भव्य होणार हे गृहित धरून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी त्यादृष्टीने पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर केले असून त्यांची कामे सुरू आहेत. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठीही अनेक प्रकल्प साकारले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर यापूर्वी कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशन यांंनी सिंहस्थात येणा-या भाविकांची संभाव्य संख्या गृहित धरून अभ्यास केला होता. त्या अभ्यासानुसार सिंहस्थामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक व्यवहारांद्वारे सुमारे २७ हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

Kumbh Mela
Nashik ZP: जिल्हा परिषेदच्या सूपर 50 उपक्रमातून फसवणूक; सेसमधून 6 कोटी खर्च

एवढ्यामोठ्या प्रमाणावर उलाढाल होणार असेल, तर त्याचा फायदा स्थानिक उद्योजक, व्यावसायीक यांना घेता यावा, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणने लघु व सुक्ष्म उद्योजक, पथविक्रेते, महिला बचत गट यांच्या क्षमता विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात या घटकांना कुंभमेळ्यातील व्यवसायाच्या संधी, व्यवसायासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर आणि आर्थिक साक्षरता या बाबींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय व्यवसाय वाढ नियोजन, डिजिटल विपणन, व्हॉट्सॲप बिझनेस, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय नोंदणी, एफएसएसएआय व उद्यम नोंदणी, डिजिटल व्यवहार, कर्जासाठी आर्थिक तयारी, विक्री कौशल्य, ब्रँडिंग, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, क्षेत्रनिहाय प्रशिक्षण तसेच तज्ज्ञांचे वैयक्तिक मार्गदर्शन आदी विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Kumbh Mela
Nashik Infra: सिंहस्थाच्या निमित्ताने 'या' 5 रेल्वेस्थानकांचा बदलणार चेहरामोहरा

सिंहस्थाच्या आर्थिक प्रवाहात स्थानिक उद्योजकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत ४ ऑगस्ट रोजी उमेदमधील महिला बचत गटांसाठी, तर ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील पथविक्रेते आणि महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

Kumbh Mela
Nashik: मुसळधार पावसात कुंभमेळा प्राधिकरण अ‍ॅक्शन मोडमध्ये! सिंहस्थातील संभाव्य अडचणींचा केला अभ्यास

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संधींचा लाभ स्थानिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. महिला बचत गट, पथविक्रेते आणि सूक्ष्म उद्योजकांना सक्षम करून त्यांचा या अर्थचक्रात सक्रिय सहभाग वाढविण्यावर आमचा भर आहे. 'अनेक' उपक्रमातून स्थानिक उद्योजकांना दीर्घकालीन व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

Tendernama
www.tendernama.com