Nashik : महापालिकेत टीसीएस राबवणार 706 पदांची नोकरभरती

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेतील ७०६ पदांची नोकरभरती राबवण्यास आईबीपीएस कंपनीने असमर्थता व्यक्त केल्यानंतर आता टीसीएस कंपनीला प्रस्ताव दिला आहे. टीसीएस कंपनीने हा प्रस्ताव स्वीकारला असल्यामुळे लवकरच महापालिकेत ७०६ पदांची भरती प्रक्रिया सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. महापालिकेती अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यासाठी संस्था निवडीचे काम डिसेंम्बरपासून सुरू आहे.

Nashik Municipal Corporation
'टेंडरनामा'ने उघड केलेला 500 कोटींचा घोटाळा गाजला विधान परिषदेतही

नाशिक महापालिकेत २४ वर्षांपासून कुठलीही नोकरभरती झाली नाही. महापालिकेत 'क' वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली. महापालिकेत सद्यःस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी नागरी सुविधा पुरवताना उपलब्ध कर्मचान्यांवर ताण पडत आहे. 

Nashik Municipal Corporation
'टेंडरनामा'ची अजितदादांकडून दखल; DGIPRच्या अधिकाऱ्यांना.. (VIDEO)

आस्थापना खर्चाची ३५ टक्के मर्यादा नोकर भरतीला अडचणीची ठरत आहे. मात्र, कोरोना काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली होती. परंतु, २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावीपडून असल्याने ही भरती अडकली होती.

Nashik Municipal Corporation
Nashik : महिंद्रा करणार अडीच ते पाच हजार कोटींची गुंतवणूक

अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवाप्रवेश नियमावली २०२२ मध्ये मंजूर केली. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने टीसीएस (टाटाकन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलसिलेक्शन) मार्फतच भरतीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आयबीपीएसने प्रथम प्रस्ताव स्वीकारला. कराराच्या अटीव शर्तीवर स्वाक्षरी करण्याची वेळ आल्यानंतर असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे टीसीएसकडे प्रस्ताव सादर केला. टीसीएसने हा प्रस्ताव स्वीकारला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com