सिंहस्थापूर्वी मोठी तयारी! त्र्यंबकेश्वरमध्ये 5 Seismic Stations उभारणार; GSI करणार 3 महिन्यांचा अभ्यास

अतिवृष्टी, भूस्खलन आणि सौम्य भूकंपाच्या पार्श्वभूमीवर GSI आणि कुंभमेळा प्राधिकरणाचा संयुक्त कृती आराखडा; ऑगस्टमध्ये संवेदनशील भागांचे फेरसर्वेक्षण
Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela 2027 LogoTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा 2027 दरम्यान संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 5 Seismic Monitoring Stations उभारून 3 महिन्यांचा सविस्तर भूकंपीय अभ्यास केला जाणार असून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) आणि कुंभमेळा प्राधिकरणाने भूस्खलन प्रतिबंध आणि वैज्ञानिक आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त कृती आराखडा निश्चित केला आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik: मुसळधार पावसात कुंभमेळा प्राधिकरण अ‍ॅक्शन मोडमध्ये! सिंहस्थातील संभाव्य अडचणींचा केला अभ्यास

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात झालेले भूस्खलन व सुरगाणा व कळवण तालुक्यात भूकंपाचे बसलेले सौम्य धक्के या पार्श्वभूमिवर नाशिक-त्र्यंबेकश्वर कुंभमेळा प्राधिकरणने त्र्यंबकेश्वरमध्ये पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे (Seismic Monitoring Stations) उभारून तीन महिन्यांचा सविस्तर भूकंपीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कुंभमेळा प्राधिकरण व भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलन प्रतिबंध आणि भूकंपीय अभ्यासासाठी संयुक्त कृती आराखडा निश्चित केला आहे. यामुळे प्रत्यक्ष सिंहस्थाच्या काळात काही आपत्ती उद्भवल्यास प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik: सिंहस्थाच्या निमित्ताने प्राचिन गोंदेश्वर मंदिराचेही होणार सुशोभिकरण; अंदाजपत्रकासाठी पीडब्लूडीचे दरटेंडर

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा हा प्रामुख्याने पावसाळ्यात असतो. सिंहस्थातील तीनही प्रमुख पर्वणी या पावसाळ्यात असल्याने या वर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवणा-या परिस्थितीचा अभ्यास करून पुढील वर्षी काय उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास कुंभमेळा प्राधिकरणकडून केला जात आहे.

या महिन्यात नाशिक व त्र्यंबेकश्वर परिसरात दोनवेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत पाणी साचणे, गोदावरीसह इतर नद्यांना आलेले पूर, भूस्खलन याचा अभ्यास केला जात असतानाच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा व कळवण तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे कुंभमेळा प्राधिकरणने नाशिकमधील विशेषतः त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना व भूकंपीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांनी जीएसआय राज्य विभागाचे उपमहासंचालक डॉ. बिभास सेन, राज्य विभागाचे संचालक मेगो चासी, जीएसआय नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक साबीर पठाण, भूभौतिकशास्त्रज्ञ अक्षय जोशी तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकित नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील भूस्खलनप्रवण ठिकाणांचे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात फेरसर्वेक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

Kumbh Mela 2027 Logo
Sinnar Road Project: सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी फुटणार! 'या' 2 प्रमुख रस्त्यांचा होणार कायापालट

या पाहणीच्या आधारे संवेदनशील स्थळांची निश्चिती करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वरमध्ये पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे (Seismic Monitoring Stations) उभारून तीन महिन्यांचा सविस्तर भूकंपीय अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासातून परिसरातील भूकंपीय हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास होणार असून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचे नियोजन आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

या अभ्यासासाठी आवश्यक जागा निश्चित करणे, जीएसआयच्या अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था आणि इतर आवश्यक समन्वयाची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरण पार पाडणार आहे.
 भूस्खलन आणि भूवैज्ञानिक अभ्यासासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार आणि समन्वय एकाच नोडल यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच, भूस्खलनग्रस्त ठिकाणांची अद्ययावत माहिती, जीपीएस निर्देशांक आणि छायाचित्रे जीएसआयला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरण पार पाडणार आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik Infra: सिंहस्थाच्या निमित्ताने 'या' 5 रेल्वेस्थानकांचा बदलणार चेहरामोहरा

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

✔ त्र्यंबकेश्वरमध्ये 5 Seismic Monitoring Stations

✔ 3 महिन्यांचा वैज्ञानिक भूकंपीय अभ्यास

✔ ऑगस्टमध्ये भूस्खलनप्रवण भागांचे फेरसर्वेक्षण

✔ GSI आणि कुंभमेळा प्राधिकरणाची संयुक्त कृती योजना

✔ सिंहस्थ 2027 साठी वैज्ञानिक आपत्ती व्यवस्थापनावर भर

Tendernama
www.tendernama.com