Nashik: केंद्राच्या पथकाकडून जिल्ह्याला गुड न्यूज मिळणार का?

Water
WaterTendernama

नाशिक (Nashik) : केंद्र सरकार पुरस्कृत जलशक्ती मंत्रालयाच्या कॅच द रेन (Catch The Rain) उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हात जलसंधारण, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) आदी विभागांनी जलसंधारणविषयक केलेल्या कामांचा लेखाजोखा घेण्यासाठी केंद्रीय पथक तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहे. 

पथक जिल्ह्यातील काही गावाना भेटी देऊन जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत पाणी पुरवठा व अमृत सरोवरच्या कामांची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा जलशक्ती अभियानचे सदस्य सचिव हरिभाऊ गिते यांनी दिली.

Water
Nashik दादा भुसेंचा 'तो' निर्णय रद्द करा! 6 आमदारांचा 'लेटर बॉम्ब'

जलशक्ती मंत्रालयाकडून कॅच द रेन या उपक्रमांतर्गत जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची जलशक्ती अभियान कॅच द रेन ही कालबद्ध मोहिम असून या मोहिमेचा कालावधी ३० सप्टेबर २०२३ पर्यंत असून पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोतांचे जियो टॅगिंग करणे, पिण्याच्या योजनांच्या भूजल स्त्रोतांचे पुनर्भरण करणे व ते स्रोत शोधून काढणे हा या मोहिमेचा हेतू आहे.

यासाठी जिल्ह्यातील कामाचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारत आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयाचे उपसचिव रॅाय महिमापत रे व जलशक्ती अभियानाचे तांत्रिक अधिकारी पंकज बक्षे यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

दौऱ्यावर आलेल्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. पुढील तीन दिवस हे पथक ग्रामीण भाग तसेच महापालिका क्षेत्रातील जलस्रोतांची पाहणी करणार आहे.

Water
Nashik: जिल्हाधिकाऱ्यांनी का रोखली रोजगार हमीची व्हेंडर नोंदणी?

अमृत सरोवर योजनेची पाहणी

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जलसंधारण विभागाने नाशिक जिल्ह्यात १६४ अमृत सरोवर मंजूर करून त्यातील १३८ अमृत सरोवर पूर्ण केले आहेत. यात जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन करणे, नवीन तलाव उभारणे आदी कामे करण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून १२२२ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली असून, त्यांची कामे सुरू आहेत. या पाणी पुरवठा योजनांच्या जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी या पथकाकडून संबंधित यंत्रणांना उपाययोजना सूचवल्या जाणार आहेत. त्याच प्रमाणे नाशिक महापालिका हद्दीतील पारंपरीक जलस्रोतांचीही पाहणी या पथकाकडून केली जाणार आहे.

शहरातील पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत या पथकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान हे पथक शुक्रवारी पेठ तालुक्यातील जलसंधारण, जल जीवन मिशन, मिशन भगीरथ प्रयास या योजनेतून सुरू असणाऱ्या कामांची पाहणी करणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com