नाशिककरांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार; जलसंपदा विभागाने पाणी दर वाढवले

घरगुती पाण्याचा दर ५५ पैशांवरून ८० पैसे; महापालिकेचा वार्षिक पाणीखर्च २५ कोटींवरून ३६ कोटींवर जाणार
Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

नाशिक (Nashik): राज्याच्या जलसंपदा विभागाने महापालिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेला घरगुती वापरासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा दर प्रति हजार लिटर ५५ पैशांवरून ८० पैसे करण्यात आला आहे. वाणिज्यिक वापराचा दर २ रुपये ७५ पैशांवरून ४ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे नाशिक महापालिकेच्या पाणीखर्चात वाढ होणार असून, हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी महापालिका नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Elliptical Dams: कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे 7 दिवसांत सुरू करा; अन्यथा कंत्राटदारांना दंडाचा फटका

राज्याच्या जलसंपदा विभागाकडून राज्यातील महापालिकांना पुरवण्यात येणा-या पाणीपट्टीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेला घरगुती वापरासाठी पुरवल्या जाणा-या पाण्यासाठी प्रति हजार लिटरसाठी ५५ पैशांवरून ८० पैसे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाणिज्य वापराचा दर २.७५ रुपयांवरून ४ रुपये करण्यात आला आहे.

महापालिकेच्या पाणीपट्टात दरात ४५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याने नाशिक महापालिकेला वार्षिक बारा कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त दर द्यावे लागणार आहे. पाणीपट्टीचा हा बोजा कमी करण्यासाठी नाशिक महापालिका पाणीपट्टीत वाढ करण्याची शक्यता यानिमित्ताने बळावली आहे.

Devendra Fadnavis
समृद्धी महामार्गालगतच्या 292 गावांसाठी विकास आराखडा; एमएसआरडीसीकडून सल्लागाराची नियुक्ती

नाशिक महापालिकेला गंगापूर, दारणा, मुकणे या तीन धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून प्रतिदिन १४.७४ दशलक्ष घनफुट, मुकणे धरणातून साधारण पाच, दारणा धरणातून साधारण दररोज एक दशलक्ष घनफूट पाणी उचलले जाते. शहरासाठी दररोज साधारण २१ ते २२ दशलक्ष घनफूट पाणी उचलले जाते. महापालिका नागरिकांकडून या पाणी वापरा पोटी पाणीपट्टी वसुली करते व ही धरणे जलसंपदा विभागाची असल्याने महापालिका जलसंपदा विभागाला पाणीपट्टी जमा करीत असते.

जलसंपदा विभाग सध्या महापालिकेकडून घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटर ०.५५ रुपये, वाणिज्य वापरासाठी २.७५ रुपये दर आहे. आता सुधारित दरानुसार घरगुती दर ०.८० रुपये आणि वाणिज्य दर ४.०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढ घरगुती वापरासाठी ४५ टक्के आणि वाणिज्य साठी २१ टक्के आहे. दारणा नदीपात्रातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यासाठी घरगुती दर १.१० रुपये होता. तो दर १.६० रुपये आणि वाणिज्य दर ५.५० रुपयांवरून ८.०० रुपये प्रति हजार लिटर करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी काकोडकर समितीने जनसुनावणी घ्यावी

मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०२५-२६ मध्ये महापालिकेने जलसंपदा विभागाला सुमारे २५ कोटी रुपये पाणी उचलण्यापोटी अदा केले होते. आता नवीन दरानुसार सन २०२६-२७ मध्ये सुमारे ३६ कोटी रुपये अदा करावे लागणार आहे.

नवीन दरवाढ अशी (प्रति हजार लिटर/रुपये)
वापराचा प्रकार सध्याचा दर     नवीन दर
घरगुती             ०.५५            ०.८०
वाणिज्य         २.७५             ४.००

Devendra Fadnavis
Nashik: गंगापूर धरणातील चर खोदण्याच्चा कामाला यंदा मुहूर्त लागणार

Key Points

  • जलसंपदा विभागाने नाशिक महापालिकेसाठी पाण्याचे दर वाढवले

  • घरगुती पाण्याचा दर प्रति हजार लिटर ५५ पैशांवरून ८० पैसे झाला

  • वाणिज्यिक पाण्याचा दर २ रुपये ७५ पैशांवरून ४ रुपये झाला

  • नाशिक महापालिकेला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो

  • २०२५-२६ मध्ये महापालिकेने जलसंपदा विभागाला सुमारे २५ कोटी रुपये अदा केले

  • २०२६-२७ मध्ये पाणीखर्च सुमारे ३६ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

  • अतिरिक्त खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी पाणीपट्टी वाढण्याची शक्यता

Tendernama
www.tendernama.com