Nashik: गंगापूर धरणातील चर खोदण्याच्चा कामाला यंदा मुहूर्त लागणार

अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस लांबण्याची शक्यता गृहित धरून नाशिक महापालिकेकडून उपाययोजना सुरू
Nashik
gangapur damTendernama
Published on

नाशिक (Nashik): अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस लांबण्याची शक्यता गृहित धरून नाशिक महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गंगापूर धरणातील पाण्याचा वापर ३१ ऑगस्टपर्यंत करता यावा यासाठी नाशिक महापालिकेने अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले गंगापूर धरणात चर खोदण्याचे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik
Nashik: नाशिकरोडची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने काय शोधला उपाय?

यामुळे मागील वर्षी तयार करण्यात आलेला चर खोदण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल फॉरेस्ट या सल्लागार संस्थेने महापालिकेला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसाल चर खोदण्यासाठी तब्बल १४.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नाशिक महापालिकेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतून ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर झाले आहे. हे आरक्षित पाणी ३१ ऑगस्टपर्यंत वापरता येणार आहे. दरवर्षी साधारणपणे जुलैमध्ये गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होत असते.

ऑगस्टमध्ये या धरणांमध्ये सरासरी ७० टक्क्यांच्या आसपास साठा असतो. मात्र, यंदा हवामान विभागाने अल निनोचा पावसावर परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाऊस लांबण्याचीही शक्यता आहे, हे गृहित धरून जलसंपदा विभागाने नाशिक महापालिकेला आरक्षित पाणी ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरवावे, अशी सूचना महापालिकेला दिली आहे.

Nashik
Nashik: आता सिंहस्थातील रस्त्यांच्या गुणवत्तेवर असणार IIT Bombay चे लक्ष

यामुळे महापालिकेने गंगापूर धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत वापरता यावा, यासाठी उपाययोजना करण्याच निर्णय घेतला आहे. नाशिक शहराला धरणांतून दररोज ६०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. या हिशेबाने सद्यस्थितीतील साठ्याचा विचार केल्यास धरणांमधील शिल्लक पाणी केवळ १२ऑगस्टपर्यंत पुरणार आहे.

उर्वरित १८ दिवसांचा तुटवडा भासू नये म्हणून नाशिक महापालिकेने पाणी आरक्षण ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरवावे अशी जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना दिली आहे. उर्वरित दिवसांचा पाणी तुटवडा दूर करण्यासाठी महापालिकेसमोर गंगापूर धरणातील जॅकवेलपासून दूरच्या भागात असलेल्या ६०० दलघफू मृतसाठ्यातील पाण्याचा पर्याय आहे.  हे पाणी मिळवण्यासाठी महापालिकेलात्या पाण्यापासून जॅकवेलपर्यंत चर खोदण्याचा पर्याय आहे.

Nashik
Thane: ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय दिले आदेश?

महापालिकेने दोन वर्षापूर्वी याबाबत टेंडर प्रक्रिया राबवली होती. मात्र, त्या टेंडरची फाईल मंत्रायलात गहाळ झाली होती. मागील वर्षी महापालिकेने सल्लागार संस्थेला प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले. मात्र, तो अहवाल तयार होईपर्यंत गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा झाला होता. यामुळे त्या संस्थेच्या प्रकल्प अहवालाच्या आधारे यंदा चर खोदण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने वेळेत चर खोदल्यास पाणीकपात करण्याचीही गरज पडणार नाही. यासाठी महापालिकेने फॉरेस्ट या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संस्थेने धरणातील परिस्थितीचा अभ्यास करून खर्चाचा अंदाज दर्शविणारा आर्थिक अहवाल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सादर केला आहे. त्यानुसार चर खोदण्यासाठी सुमारे १४.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गंगापूर धरणाची पाणीपातळी १५८ मीटर खाली गेल्यास पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे धरणात चर खोदून मृतसाठ्यातील पाणी आणण्याची योजना आहे.

चर खोदण्यासाठी गंगापूर धरणात प्रचंड खडक असल्याने अडचण होत आहे. धरण मातीचे असल्याने सदर खडक फोडण्यासाठी डायरेक्ट ब्लास्ट वापरल्यास धरणाला धोका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध पद्धतीने खडकांचा अडथळा दूर केला जाणार आहे.

Tendernama
www.tendernama.com