सुरगाण्यात 'डार्क स्काय डेस्टिनेशन'; आदिवासी गावात उभे राहणार आंतरराष्ट्रीय खगोल पर्यटन केंद्र

उधमाळमध्ये ४२.१४ लाखांचा जिल्हा नियोजन निधी मंजूर; ॲस्ट्रो-स्लॅब, प्रकाश प्रदूषण नियंत्रण, होम स्टे आणि स्थानिक कलांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन
सुरगाण्यात 'डार्क स्काय डेस्टिनेशन'
Nashik, StartupTendernama
Published on

नाशिक (Nashik): उत्तर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील अनुभवजन्य पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या आदिवासीबहुल गावाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’ अर्थात खगोल पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४२.१४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सुरगाण्यात 'डार्क स्काय डेस्टिनेशन'
जांबुटके एमआयडीसीचा ‘श्रीगणेशा’; ५९.७३ कोटींत पायाभूत सुविधा उभारणार

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी उधमाळ गावाची पाहणी केली. त्यानंतर या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधीतून निधी मंजूर करण्यात आला.

केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुक्यांच्या यादीत सुरगाणा तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात शिक्षण, आरोग्य आणि कुपोषणाच्या समस्या सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठीही निधी दिला जातो. त्याचबरोबर सुरगाण्यातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

सुरगाण्यात 'डार्क स्काय डेस्टिनेशन'
नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने भूमिका बदलली; अखेर गंगापूर डावा कालवा सुशोभीकरणाला मंजुरी

याचाच एक भाग म्हणून उधमाळ येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) खगोल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पात ‘स्वदेस फाउंडेशन’ आणि खगोलशास्त्र क्षेत्रातील ‘ॲस्ट्रोनेरा’ संस्था तांत्रिक व अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्यरत आहेत. कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे.

उधमाळ ग्रामसभेने ‘डार्क स्काय पॉलिसी’अंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. स्थानिक समुदायाला केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनातून निर्माण होणारा आर्थिक लाभ थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सुरगाण्यात 'डार्क स्काय डेस्टिनेशन'
नाशिक झेडपीला यंदा ७५ कोटींचा वाढीव निधी; सर्वसाधारण योजनांना ९० कोटींची भर

गावात पर्यटकांसाठी होम स्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, वारली व स्थानिक कलाकृती, पारंपरिक संगीत तसेच सुरक्षित आणि व्यसनमुक्त पर्यटन वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खगोल पर्यटनासाठी ३६० अंश आकाशदर्शनाची सुविधा असलेला ॲस्ट्रो-स्लॅब उभारण्यात येत आहे. प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी शिल्डेड आणि कमी तीव्रतेचे पथदिवे बसविण्यात येत आहेत. स्थानिक युवकांना दुर्बीण हाताळणी, तारे-नक्षत्रांची ओळख, खगोलशास्त्र तसेच आदरातिथ्य आणि होम स्टे व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

दर अमावास्येला ‘बत्ती गूल अमावास्या’ उपक्रमातून कृत्रिम प्रकाश कमी करून पर्यटकांना अवकाश आणि आकाशगंगेचे दर्शन घडविण्यात येणार आहे. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी ‘स्टारगेझिंग फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येणार आहे.

सुरगाण्यात 'डार्क स्काय डेस्टिनेशन'
टेंडर कोण भरू शकतो? सरकारी काम मिळवण्यासाठीची पात्रता काय?

Key Points

  • सुरगाणा तालुक्यातील उधमाळ गावाचा ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’ म्हणून विकास,

  • प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४२.१४ लाख रुपयांचा निधी मंजूर,

  • PPP पद्धतीने खगोल पर्यटन केंद्र विकसित करण्याचे नियोजन,

  • ३६० अंश आकाशदर्शनासाठी ॲस्ट्रो-स्लॅब आणि प्रकाश प्रदूषण नियंत्रणाची व्यवस्था,

  • स्थानिक युवकांना खगोलशास्त्र, दुर्बीण हाताळणी आणि होम स्टे व्यवस्थापनाचे प्रशिक्षण,

  • होम स्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, वारली कला आणि पारंपरिक संगीताला प्रोत्साहन,

  • दर अमावास्येला ‘बत्ती गूल अमावास्या’ उपक्रम आणि ३१ ऑक्टोबरला ‘स्टारगेझिंग फेस्टिव्हल’.

Tendernama
www.tendernama.com