Nashik: 'स्मार्ट सिटी' अ‍ॅक्शन मोडवर! आणखी 28 सिग्नल, 90 मेसेज डिस्प्लेसाठी काढले 105 कोटींचे टेंडर

Nashik City
Nashik City
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने शहरात वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी आणखी २८ ठिकाणी सिग्नल व ९० व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले बोर्ड बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शहरातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आधीच्या ४० सिग्नल यंत्रणेत आणखी २८ची भर पडणार आहे. हा प्रकल्प उभारणारी संस्था १५ वर्षे देखभाल करून तो महापालिकेकडे हस्तांतरित करणार आहे.

Nashik City
Nashik: सिंहस्थापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त; 227 कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला मंजुरी

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर हजारो कोटींची कामे सुरू आहेत. नाशिक शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिंहस्थ काळात लाखो भाविक शहरात येणार असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेने शहरात आणखी २८ नवीन सिग्नल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ९० ठिकाणी मेसेज डिस्प्ले लावण्यात येणार आहे.

या डिस्प्लेच्या माध्यमातून शहरात येणारे भाविक तसेच नागरिक यांना ठिकाणे व दिशा यांची माहिती मिळू शकणार आहे. ही दोन्ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर केली जाणार आहेत. यासाठी साधारण १०५ कोटी रुपये खर्च येणार असून हे उभारून देणाऱ्या संस्थेने त्याची उभारणी केल्यानंतर १५ वर्षे देखभाल करायची आहे. त्यानंतर हा प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करायचा आहे.

Nashik City
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील कोंडी फुटल्यानंतर आता Missing Link बाबत काय आली बातमी?

"व्हीएमडी बोर्ड म्हणजे डिस्प्ले मेसेज फलक हे सर्व विद्यमान आणि प्रस्तावित ट्रॅफिक सिग्नल जंक्शनवर बसवले जातील. हे डिजिटल बोर्ड कुंभमेळ्या दरम्यान ट्रॅफिक डायव्हर्शन, कोंडी आणि इतर सूचनांबाबत रिअल-टाइम अपडेट देऊन रहिवासी आणि भाविकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०२७ मध्ये लाखो भाविकांच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीच्या योग्य नियोजनासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. 

Nashik City
Mumbai: मरिना प्रकल्पासाठी बलाढ्य कंपन्यांमध्ये चुरस; 887 कोटींचे टेंडर

या प्रकल्पांतर्गत  ९० ठिकाणी मेसेज डिस्प्ले बोर्ड बसवले जातील. या उभारणीच्या बदल्यात खासगी एजन्सीला डिजिटल बोर्डवर जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवण्यास परवानगी दिली जाईल, नवीन सिग्नल आणि मेसेज डिस्प्ले बोर्ड बसवण्याचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. सध्या नाशिकमध्ये ४० ट्रॅफिक सिग्नल आहेत. नवीन सिग्नल सुरू झाल्यानंतर त्यांची संख्या ६८ पर्यंत वाढेल.

स्मार्ट सिटी कंपनीने या प्रकल्पासाठी टेंडर काढले असून, १० फेब्रुवारी ही बोली सादर करण्याची अंतिम तारीख आहे. अलीकडेच प्री-बिड मीटिंग झाली होती, ज्यात पुणे, हैदराबाद आणि नाशिकमधील इच्छुक एजन्सीनी सहभाग घेतला

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com