Nashik: 4500 कोटींच्या 'या' कामासाठी मनपाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक-त्र्यंबकेश्‍वर (Nashik - Trimbakeshwar) येथे दर बारा वर्षांनी होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela) २०२७-२८ या वर्षात होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला केवळ चार वर्षे बाकी असून महापालिकेने (NMC) पूर्वतयारी सुरू केली आहे.

Nashik
Pune: बकोरियांच्या दणक्याने PMPचा 'टॉप गियर'; उत्पन्नचा नवा विक्रम

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा राखीव ठेवण्यासाठी महापालिकेने पावणेचारशे एकर जागा संपादित करायची आहे. मात्र, शहरातील रेडीरेकनरचे दर पाहता हे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला साडेचारशे कोटी रुपयांची गरज आहे. महापालिकेच्या पातळीवर एवढ्यामोठ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी ४५०० कोटी रुपये उभारणे शक्य नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने साधुग्रामसाठी राज्य सरकारने भूसंपादन करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

Nashik
Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपचे सरकार आल्यानंतर एकदमच चार वर्षांवर असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीला वेग दिला गेला आहे. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीही बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही महापालिकेकडे साधुग्रामसाठी सध्या असलेले आरक्षण व त्यातील संपादित आणि उर्वरित संपादित करण्याची गरज असलेल्या जागेसंबंधी अहवाल मागवला आहे.

त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. साधुग्राम परिसरातील जागांचे रेडिरेकनरचे दर बघता पावणेचारशे एकर जमीन संपादनासाठी ४५०० कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक वळणावर आहे. महापालिकेच्या २०२२-२३ या वर्षाच्या २२०० कोटींच्या अंदाजपत्रकात गृहित धरलेल्या उत्पन्नात जवळपास ४५० कोटींची तूट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात वर्षासाठी भूसंपादनासाठी दोनशे कोटींपेक्षा अधिक रकमेची तरतूद करणे शक्य नाही. यामुळे साधुग्रामचे भूसंपादन राज्य सरकारने करावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

Nashik
Nashik: 10 हजार कोटींतून साकारणार 60 किमीचा बाह्यरिंगरोड प्रकल्प

सद्यस्थितीत तपोवनातील २६४ एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण असून १७ एकर जागा वाहनतळ व अग्निशमन दलासाठी आरक्षित आहे. तसेच महापालिकेच्या ताब्यात ५४ एकर जागा आहे. सध्या सुमारे साडेतेरा एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित जागा संपादित करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाचपट टीडीआर देऊन भूसंपादन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने रेडीरेकनरच्या दरानुसार अंदाज लावला आहे. यामुळे साधुग्रामसाठी भूसंपादन करण्यास जवळपास सव्वाचार हजार कोटी रुपयांची गरज असल्याने शासनाला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

Nashik
Railway: गुड न्यूज; पुणे-मिरज प्रवास होणार सुसाट, कारण...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बाह्य रिंग रोड तयार केला जाणार आहे. पाथर्डी ते आडगाव दरम्यान साठ मीटरचा तर गरवारे पॉईंट ते आडगाव यादरम्यान 36 मीटर लांबीचा रिंग रोड करण्याचे नियोजन आहे. रिंग रोड साठी भूसंपादन करावे लागणार असल्याने रोख स्वरूपात मोबदला न देता इन्सेंटिव्ह टीडीआर देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला सादर केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com