Pune: बकोरियांच्या दणक्याने PMPचा 'टॉप गियर'; उत्पन्नचा नवा विक्रम

Omprakash Bakoria PMP
Omprakash Bakoria PMPTendernama

पुणे (Pune) : आर्थिक कचाट्यातून मार्ग काढत धावणाऱ्या पीएमपी (PMP) प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत सार्वधिक ५१ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. ब्रेकडाऊनचे (Break Down) घटलेले प्रमाण, कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसची (PMP Bus) संख्या कमी करून त्या बस शहराच्या विविध मार्गावर सोडणे आदी कारणांमुळे पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.

Omprakash Bakoria PMP
Nashik: 10 हजार कोटींतून साकारणार 60 किमीचा बाह्यरिंगरोड प्रकल्प

पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा म्हणून पीएमपीला ओळखले जाते. पीएमपीच्या १६५० बसमधून रोज सुमारे १३ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीचे उत्पन्न वाढीसाठी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) यांनी सुरू केलेल्या प्रयत्नाचे परिणाम काही प्रमाणात दिसून येत आहे. पीएमपीला नोव्हेंबरमध्ये ५१ कोटी पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले होते तर, डिसेंबरमध्ये ५१ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

उत्पन्न वाढीबरोबरच प्रवाशांना जलद आणि भरवशाची सेवा देण्यासाठी पीएमपी प्रशासनात काही बदल केले आहेत. ब्रेक डाऊनमुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून सतत ब्रेक डाऊन होणाऱ्या बसला संचलनातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तोट्यात असलेल्या मार्गावरील बस कमी करून गर्दीच्या ठिकाणी बस संख्या वाढवली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याबरोबरच उत्पन्नात वाढ झाली आहे.

Omprakash Bakoria PMP
High Court:बीडबायपास पुलाच्या अभियंत्यांना कोणता पुरस्कार द्यायचा?

कसे वाढले उत्पन्न

१. ब्रेकडाऊन बसबाबत कारवाई भूमिका घेतल्याने ठेकेदारांनी बसच्या देखभाल व दुरुस्तीला गांभीर्याने घेतले. परिणामी ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झाले.

२. ग्रामीण भागात कमी उत्पन्नाच्या मार्गावरची सेवा बंद केली. त्यामुळे तोट्यात धावणाऱ्या बसच्या खर्चात घट.

३. जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसच्या अधिक फेऱ्या.

४. सकाळी व संध्याकाळी बसच्या फेऱ्यांत वाढ, परिणामी जास्त प्रवाशांची वाहतूक.

५. बसच्या वेळापत्रकात बदल, एकाच मार्गावर ठराविक अंतराने बस सोडण्यास सुरवात.

Omprakash Bakoria PMP
Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

डिसेंबरमध्ये ५० हजार ५६४ फेऱ्या

पीएमपीच्या डिसेंबरमध्ये ५० हजार ५६४ फेऱ्या झाल्या. यात २९ हजार १८६ बस ठेकेदाराच्या तर, २१ हजार ३७८ बसच्या फेऱ्या पीएमपीच्या मालकीच्या होत्या. या बसमधून तीन कोटी ६९ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. निव्वळ तिकीट विक्रीतून ४६ कोटी ४७ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे

Omprakash Bakoria PMP
Housing: घर खरेदी करण्याचा विचार असेल तर ही बातमी नक्की वाचा...

आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न (वर्षे - उत्पन्न)

२०२२ (डिसेंबर) - ५१ कोटी ७७ लाख

२०२२ (नोव्हेंबर) - ५१ कोटी पाच लाख

२०२२ (सप्टेंबर) - ४४ कोटी ४८ लाख

२०१७ (ऑगस्ट) - ४२ कोटी ३० लाख

Omprakash Bakoria PMP
MHADA : इतिहासात पहिल्यांदाच 35 मजली इमारत; कुठे आहेत नवी घरे?

पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यासोबतच खर्चात बचत करण्याचे ठरविले होते. त्यानुसार निर्णय घेण्यात येत होते. ब्रेकडाऊन बसवरील कारवाई व तोट्यातील फेऱ्या बंद करणे याचा मोठा परिणाम झाला.

- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com