MHADA
MHADATendernama

MHADA : इतिहासात पहिल्यांदाच 35 मजली इमारत; कुठे आहेत नवी घरे?

Published on

मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळातर्फे आतापर्यंत २२ मजली निवासी इमारत बांधली आहे, मात्र पहाडी गोरेगाव येथील गृहप्रकल्पात इतिहासात पहिल्यांदाच ३५ मजली इमारत बांधण्यात येत आहे.

MHADA
Thane SRA Project : प्रकल्पांना गती; रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरे

म्हाडातर्फे आतापर्यंत कोणत्याही इमारतीत सज्जा, जलतरण तलाव, व्यायामशाळा, विद्युत वाहन चार्जिग स्थानक अशा सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पण या प्रकल्पात उच्च आणि मध्यम गटासाठी या सर्व सुविधा आहेत. या घरांची किंमत ८० लाख रुपये ते सव्वा कोटी रुपयांदरम्यान असणार आहे. मुंबई मंडळाला २५ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर गोरेगाव येथे एक भूखंड उपलब्ध झाला आहे. मंडळातर्फे त्यावर गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे.

MHADA
Thane : काटई नाका ते तळोजा MIDC रस्ता रुंदीकरण; 212 कोटींचे बजेट

बांधकाम कंत्राटदार शिर्के कंपनीच्या माध्यमातून ३०१५ घरांची दोन टप्प्यांत बांधणी करण्यात येत आहे. भूखंड 'अ'वर अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३२२.६० चौ. फुटांची १,२३९ घरे बांधण्यात येत असून भूखंड 'ब'वर अत्यल्प गटासाठी ७०६, अल्प गटासाठी ७३६, मध्यम गटासाठी १०५ आणि उच्च गटासाठी २२७ घरे बांधण्यात येत आहेत. याच प्रकल्पातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांची १० टक्के कामे झाली असून ही घरे २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

MHADA
EXCLUSIVE : कोविड खरेदीतील 'बाजीराव'; दोन वर्षात 200 कोटीची उलाढाल

या प्रकल्पात ३५ मजले अधिक तीन मजले पोडियम वाहनतळ असलेली इमारत बांधण्यात येत आहे. यात मध्यम गटासाठी ७९४.३१, तर उच्च गटासाठी ९७९.५८ चौरस फुटाची घरे असणार आहेत. प्रकल्पात सज्जा, जलतरण तलाव, व्यायामशाळा, विद्युत वाहन चार्जिग स्थानकाची सुविधा उपलब्ध आहे.

Tendernama
www.tendernama.com