EXCLUSIVE : कोविड खरेदीतील 'बाजीराव'; दोन वर्षात 200 कोटीची उलाढाल

महापालिका आणि मोठ्या नगर परिषदांमधील कोविड घोटाळे चर्चेत
Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : कोविड (Covid) काळात मुंबई महानगर प्रदेशातील 'एमएमआर'मधील महापालिका, नगर परिषदांच्या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय उपकरणांची खरेदी झाली. सुमारे २०० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची खरेदी एका व्यक्तीच्या माध्यमातून झाली. हे खरेदीचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आले आहे. कोविड काळातील खरेदीचा हा 'बाजीराव' नेमका कोण आहे, असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे.

Mumbai
EXCLUSIVE : महापालिका, नगर परिषदांतील COVID घोटाळे येणार बाहेर?

कोरोना महामारीत मुंबईतील कोविड केंद्रांसह विविध उपाययोजना व खरेदीच्या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात 'ईडी'ने चौकशी सुरु केली आहे. चहल यांनी चौकशीसाठी दाखल होण्यापूर्वी माध्यमांसमोर फक्त मुंबई महापालिकेची नाही तर राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चहल यांच्या मागणीमुळे मुंबई महानगर प्रदेशातील इतर महापालिका आणि मोठ्या नगर परिषदांमधील कोविड घोटाळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Mumbai
Davos 2023: पहिल्याच दिवशी 46 हजार कोटींची गुंतवणूक; 10000 रोजगार

कोविड काळात एका बाजूला डॉक्टरांसह आवश्यक मनुष्यबळ पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि इतर अनुषंगिक खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. तर दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर खूप मोठा खर्च करण्यात झाला आहे. एमएमआरमधील ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिका व अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या मोठ्या नगर परिषदांमधील शेकडो कोटींच्या खरेदीचा विषयही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Mumbai
Davos : महाराष्ट्र उद्योजकांच्या पसंतीस; 1 लाख 37000 कोटींचे करार

ठाणे, नवी मुंबई या महापालिकांचे प्रमुख हे थेट आयएएस अधिकारी असतात. 'केडीएमसी'सारख्या महापालिकेवर प्रमोटी आयएएस तर इतर ब, क, ड वर्ग महापालिकांवर नगरविकास विभागाच्या मुख्याधिकारी संवर्गातील वरिष्ठ अधिकारी आयुक्त म्हणून नेमले जातात. एमएमआरमध्ये 'सीओ' केडरच्या या बाबूंचे लॉबिंग मजबूत आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणी वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीत एक विशिष्ट यंत्रणा कार्यरत होती. कोविड काळात मास्क, हँड ग्लोव्ह्ज, पीपीई किट पासून ते विविध औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन प्लांटपर्यंत अनेक बाबींची आवश्यकता होती. 'पैशाचा तुटवडा नव्हता' पण सुरुवातीला या सगळ्या गोष्टींचा मोठा तुटवडा जाणवत होता.

Mumbai
BMC : स्कायवॉक सुशोभीकरणासाठी ८० कोटी; 'या' कंपन्यांना टेंडर

कोरोनाचे संकट नवेच असल्याने कधी काय लागेल याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. याकाळात संकट ही संधी समजून सीओ केडरच्या बाबूंच्या मदतीला एका 'पॉवरफुल' लिंकमधून 'बाजीराव' धावून आला. वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या उत्पादक कंपन्यांना शोधणे, त्यांच्याकडील उत्पादनांचे 'रेट' फिक्स करणे आणि महापालिका, नगरपालिकांना मागणीनुसार आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणे ही जबाबदारी नेटाने पार पाडू लागला. अधिकारी मागणी निर्माण करु लागले तर 'बाजीराव'ने जोरकसपणे पुरवठा सुरु केला. १०० टक्के सक्सेस रेट असल्याने 'बाजीराव'ने वरपासून खालपर्यंत सर्वांचा 'अर्थपूर्ण' विश्वास संपादन केला. अल्पावधीतच 'बाजीराव'चा वैद्यकीय साहित्य खरेदीत दबदबा तयार झाला.

Mumbai
Mhaisal Irrigation Scheme : 'म्हैसाळ'साठी 981 कोटींचे टेंडर

महापालिका, नगरपालिकांकडे पैशाचा तुटवडा नव्हताच, जोडीला साथरोग अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार कोरोना कामावर 'होऊ दे कितीही खर्च' अशीच स्थिती असल्याने 'बाजीराव' ने दर ठरवायचा, साहित्याचा पुरवठा व्हायचा आणि अव्वाच्यासव्वा बिले निघायची. बाबूंना त्यांची टक्केवारी व्यवस्थित मिळत होती, त्यामुळे कुणाची ना नव्हती. कोविड ही संधी समजून संगनमताने सर्व संबंधितांनी शासकीय तिजोरीवर अक्षरश: दरोडे घातले. एकीकडे रुग्णांचे जीव जात होते दुसरीकडे यंत्रणा लूट करण्यात मश्गुल होती. ही महामारी 'बाजीराव'च्या चांगलीच पथ्यावर पडली. कोविडच्या २ वर्षात 'बाजीराव'ने गरुडभरारी घेतली. बीड जिल्ह्यातून आलेल्या एका साध्या तरुणाने अवघ्या दोनच वर्षात २०० कोटींच्या उलाढालीचा यशस्वी टप्पा पार केला.

Mumbai
शिंदेंची भाजपवर कुरघोडी? फक्त शिंदे गटाच्या नेत्यांना खर्चाची मुभा

आजघडीला 'बाजीराव' एमएमआरमधील अधिकारी वर्तुळाच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या बाबूंना तो सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर असतो. मोक्याच्या ठिकाणी नियुक्ती मिळवण्यासाठी बाबूंना तो यथाशक्ती आर्थिक रसदही पुरवतो, अशीही चर्चा आहे. हल्ली 'बाजीराव' रेंज रोव्हर डिस्कव्हरी, मर्सिडीज अशा लक्झरी गाड्यांमधून फिरताना नजरेस पडतो. गेल्या पावसाळ्यात 'बाजीराव'ने मुंबई जवळच्या एका मोठ्या नेत्याच्या नावाने तब्बल दीड लाख पावसाळी छत्र्यांचे मोफत वाटप केले होते, तेव्हाही तो अनेकांच्या नजरेत भरला होता.

Mumbai
मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 15 मिनिटांत; नोव्हेंबरचा मुहूर्तही ठरला

राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर 'बाजीराव'ने एका मोठ्या नेत्याच्या अभिनंदनार्थ मलबार हिल परिसरात लावलेले पोस्टर्स चर्चेत आले होते. अलीकडेच ९ जानेवारी रोजी 'बाजीराव'च्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय परिसरात जोरदार पोस्टरबाजी पहायला मिळाली. 'बाजीराव'ची घोडदौड सुरुच आहे, 'बाजीराव'ला आता विधानसभेचे वेध लागले आहेत. 'बाजीराव'ला एका दिलदार मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असल्याने तो आगामी काळात महाराष्ट्राच्या विधीमंडळात दिसून शकतो अशी चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com