Nashik: सिंहस्थापूर्वी कामे करा, अन्यथा रेल्वे लेव्हल क्रॉसिंग बंद

कुंभमेळा प्राधिकरणकडून रेल्वेला सूचना
रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
Indian RailwayTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक जिल्ह्यात रेल्वे मार्गावर १६ ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग आहे. म्हणजे या ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडून माणसे, वाहने ये जा करतात. आगामी सिंहस्थातील रेल्वे गाड्यांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार या १६ ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग यांच्या कामांना याआधीच मंजुरी दिली आहे. ही कामे डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान त्यातील काही कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण न झाल्यास तेथील लेव्हल क्रॉसिंग सिंहस्थ पर्वणी काळात तीन महिन्यांसाठी बंद ठेवावे लागतील, असे कुंभमेळा विकास प्राधिकरणकडून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे.

रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
Nashik Metro: नाशिकच्या मेट्रोबाबत केंद्र सरकारचे मौन का? खासदार वाजे यांच्या प्रश्नाला गोलमाल उत्तर

जुलै ते  सप्टेंबर २०२७ या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असून रेल्वे व रस्ते वाहतुकीत लक्षणीय वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करताना रेल्वे वाहतूक अखंड सुरू राहील आणि सार्वजनिक सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्थापन प्रभावी राहील, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून नियोजन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने, उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यस्त रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे उड्डाणपूल (ROB), रेल्वे अधोमार्ग (RUB), मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग याबाबत माहिती दिली.

रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाची तयारी सुरू; टेंडर प्रक्रियेला...

या सर्व ठिकाणी कामांना मंजुरी दिली आहे. ही कामे डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचाही सूचना आहेत. मात्र, यातील बहुतांश ठिकाणी अद्याप भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नसून ती कधी पूर्ण होईल, हेही निश्चित नाही. यामुळे सिंहस्थ पर्वणीपूर्वी म्हणजे जून २०२७ पूर्वी ती कामे पूर्ण न झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते.

ही बाब लक्षात घेऊन ती कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण न झाल्यास पर्वणी काळात तीन महिने  लेव्हल क्रॉसिंग बंद ठेवून नियोजित पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

या पर्यायी मार्गांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची व्यवहार्यता तपासण्यासाठी तसेच वेळेत ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) देण्याच्या प्रक्रियेसाठी कुंभमेळा प्राधिकरणाने २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या सर्व संबंधित ठिकाणी संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेचे नवा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचा
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसाठी राज्य सरकारने काय दिली गुड न्यूज?

या सर्वेक्षणांमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच इतर संबंधित यंत्रणा आणि मध्य रेल्वेचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

या संयुक्त सर्वेक्षणांच्या माध्यमातून पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे अंतिम रूप निश्चित करण्यात येणार असून स्थानिक गावांतील वाहतूक संपर्क, नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांना जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आवश्यक नकाशे, वाहतूक माहिती आणि प्रस्तावांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षणांची प्रगती तसेच तात्पुरत्या बंद व पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबतचे निर्णय २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या पुढील समन्वय बैठकीत आढावा घेण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com