Saptashrungi Gad
Saptashrungi GadTendernama

Nashik: सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी 15 मार्चपर्यंत एकेरी वाहतूक, कारण काय?

सप्तशृंगी गड ते नांदुरी रस्त्याचे व्हाइट टॅपिंग केले जाणार
Published on

नाशिक (Nashik): सप्तशृंगी गड ते नांदुरी या रस्त्याचे व्हाइट टॅपिंग तसेच व्हॅली साइड रिटेनिंग वॉलच्या कामामुळे 15 मार्च 2026 पर्यंत या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे.

Saptashrungi Gad
Nashik News: नाशिकचा प्रचार विकासाच्या वळणावर! डिफेन्स कॉरिडॉर, MIDC पण आयटी पार्क अजूनही 'घोषणेतच'

या काळातील नियंत्रित वेळापत्रकानुसार वाहने सोडण्यात येणार असून, नांदुरीकडे आणि नांदुरीहून सप्तशृंगीकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेच्या अंतराने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहने जाण्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

प्रत्येक सत्रानंतर 30 मिनिटे प्रवास पुर्ण होण्यासाठी क्लिअर टाईम असणार आहे. एका वेळेस फक्त एकाच दिशेने वाहतूक सुरू राहील व गाडी पोहचेपर्यंत विरूद्ध दिशेची वाहतुक थांबवली जाणार आहे.

Saptashrungi Gad
Missing Link: प्रतीक्षा संपली; मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट! मार्चमध्ये मिसिंग लिंक...

नांदुरी ते सप्तशृंगी गड हा रस्ता डोंगराळ भागातून जात असून, रस्त्याची रुंदी मर्यादित, तीव्र वळणे व उतार-चढाव असल्याने कामाच्या कालावधीत दुहेरी वाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व सुरक्षित होण्यासाठी काँक्रिट टाकल्यानंतर आवश्यक क्युअरिंग कालावधी पूर्ण होणे गरजेचे आहे.

या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवल्यास रस्त्याच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सण-उत्सवांच्या काळात भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे यांनी कळवले आहे.

Saptashrungi Gad
Pune Ring Road: रिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण होणार

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी  व सुरक्षितेच्या दृष्टीने 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 पर्यंत नियंत्रित वेळापत्रकानुसार सप्तशृंगी–नांदुरी रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था (Only One Way Traffic) लागू असणार आहे.

 नियंत्रित वेळापत्रकानुसार नांदुरीकडे आणि नांदुरीहून सप्तशृंगीकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेच्या अंतराने सुरू करण्यात येणार असून वाहनांना आवश्यक ‘क्लिअर टाईम’ ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पोलीस वाहने, दैनंदिन आपत्कालीन सेवा, शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस आदी अत्यावश्यक सेवांना परिस्थितीनुसार तत्काळ मार्ग मोकळा करून देण्यात येणार आहे.

Saptashrungi Gad
Nashik: दिवाळखोरीत गेलेल्या सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पाबाबत काय आली गुड न्यूज?

असे आहे वेळापत्रक

सकाळ सत्रात...

नांदुरी ते सप्तश्रृंगी गड - सकाळी 6 ते 6.30, 8 ते 8.30, 10 ते 10.30

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी - सकाळी 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30

दुपार सत्रात... 

नांदुरी ते सप्तश्रृंगी गड - दुपारी 12 ते 12.30, 2 ते 2.30

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी - दुपारी 1 ते 1.30, 3 ते 3.30

संध्याकाळ सत्र...

नांदुरी ते सप्तश्रृंगी गड -  4 ते 4.30, 6 ते 6.30, 8 ते 8.30 व 10 ते 10.30

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी - 5 ते 5.30, 7 ते 7.30, 9 ते 9.30, 11 ते 11.30

रात्र सत्रात... 

नांदुरी ते सप्तश्रृंगी गड - रात्री 12 ते 12.30, 2 ते 2.30, 4 ते 4.30

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी - रात्री 1 ते 1.30, 3 ते 3.30, 5 ते 5.30

Tendernama
www.tendernama.com