Nashik Ring Road: पहिली डील पूर्ण, 33 गुंठ्यांसाठी ₹3.19 कोटींची भरपाई

67 दिवसांत व्यवहार, गुंठ्याला ₹9.68 लाख; 66 किमी प्रकल्पाच्या कामाने घेतली गती
Nashik Ring Road
Nashik Ring RoadTendernama
Published on

नाशिक (Nashik): तब्बल 66.15 किमी लांबीच्या नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनाला अखेर गती मिळाली असून, अवघ्या 67 दिवसांत थेट जमीन खरेदीचा पहिला व्यवहार पूर्ण झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे 33.50 गुंठे जमिनीसाठी 3.19 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून, गुंठ्याला 9.68 लाख रुपयांचा दर मिळाला आहे.

Nashik Ring Road
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; तब्बल 316 कोटी वाया जाणार

नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावात 33.50 गुंठे क्षेत्राची थेट खरेदी करून प्रशासनाने पहिला व्यवहार पूर्ण केला. या व्यवहारासाठी शेतकरी इंदूबाई गणपत गायकवाड यांना 3 कोटी 19 लाख 65 हजार 420 रुपयांचा धनादेश देण्यात आला.

या व्यवहारात संबंधित जमिनीसाठी प्रति गुंठा 9.68 लाख रुपये असा दर निश्चित करण्यात आला. प्रशासनाने रेडी रेकनरच्या चारपट आणि त्यावर 25 टक्के अतिरिक्त दर या सूत्रानुसार भरपाई निश्चित केली आहे. तसेच विहीर व जलवाहिनीसाठी अतिरिक्त 56 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली.

Nashik Ring Road
नाशिक महापालिकेचा 3 हजार कोटींचा अर्थसंकल्प; कोणता कर 15 टक्क्यांनी वाढला?

या प्रकल्पासाठी 66.15 किलोमीटर लांबीचा चार ते सहा पदरी रिंगरोड उभारण्यात येणार असून तो शहरालगतच्या 25 गावांमधून जाणार आहे. एकूण 385 हेक्टर जमीन आवश्यक असून त्यातील 20 हेक्टर शासकीय जमीन आहे. उर्वरित जमीन संपादनासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.

मानोरी गावातील या व्यवहारासाठी प्रस्ताव 23 जानेवारी रोजी प्राप्त झाला होता. सीमांकन, सर्वेक्षण, मालकी तपासणी, नोटीस आणि हरकती यांसारख्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या 67 दिवसांत हा व्यवहार पूर्ण करण्यात आला. सामान्यतः अशा प्रक्रियेसाठी 150 दिवसांचा कालावधी लागतो.

Nashik Ring Road
वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांसाठीचा महत्त्वाचा प्रकल्प का आला अडचणीत?

हा रिंगरोड डीआरडीओ जंक्शन (राष्ट्रीय महामार्ग 60) पासून सुरू होऊन शहराला वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाणार आहे. चार राष्ट्रीय आणि चार राज्य महामार्गांना जोडणारा हा मार्ग नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे.

विशेषतः आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, शहराबाहेरील वाहतूक सुलभ करण्यासाठी हा रिंगरोड निर्णायक ठरणार आहे.

Nashik Ring Road
Nashik Ring Road: रिंगरोडच्या भूसंपादनाचा प्रश्न कसा निघाला निकाली?

असा ठरला दर

मानोरी गावात जिरायती जमिनीसाठी प्रतिहेक्टरी एक कोटी ९० लाख रुपये असा दर देण्यात आला. त्यानुसार संबंधित क्षेत्रासाठी ६३ लाख ६५ हजार रुपये बाजारमूल्य अंतिम केले. या जागेतील विहीर, जलवाहिनीसाठी ५६ हजार १६८ रुपये अतिरिक्त देण्यात आले.

रेडी रेकनरच्या चारपट आणि २५ टक्के अतिरिक्त या सूत्रानुसार एकूण तीन कोटी १९ लाख रुपये रक्कम निश्चित करण्यात आली.अंतिम भरपाई म्हणून तीन कोटी १९ लाख ६५ हजार ४२० रुपये हे गायकवाड यांना देण्यात आले. खरेदी प्रक्रियेवेळी विशेष भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, दिंडोरी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com