नाशिक महापालिकेचा 3 हजार कोटींचा अर्थसंकल्प; कोणता कर 15 टक्क्यांनी वाढला?

Nashik Municipal Corporation Budget 2026: महसुली खर्च ७५ टक्क्यांवर; आरोग्य, शिक्षण आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी वाढीव निधी
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महानगरपालिकेने २०२६–२७ आर्थिक वर्षासाठी ३,०११.९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून महसुली खर्च वाढल्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी जाहिरात करात १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांच्याकडे सादर केला.

Nashik Municipal Corporation
Samruddhi Expressway: 'समृद्धी'वरील नवीन इंटरचेंजबाबत 'एमएसआरडीसी'चे अधिकारीच अंधारात

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी नाशिक महानगरपालिकेचे (एनएमसी) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे ३,०११.९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या उत्पन्नाच्या तुलनेत महसुली खर्च ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. यामुळे उत्पन्न वाढीसाठी १ एप्रिलपासून जाहिरात करात १५ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांच्याकडे सादर करण्यात आले असून या प्रस्तावावर चर्चा होऊन गुरुवारी (ता. ५) महासभेत त्यावर चर्चा होऊन मंजुरी दिली जाणार आहे. 

नाशिक महापालिकेला आगामी आर्थिक वर्षात शिल्लक रक्कम धरून एकूण २,८६८.८ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेचा महसुली खर्च ७५ टक्क्यांच्या वर गेला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने भांडवली खर्चाची तरतूद मोठ्या प्रमाणात घटवून ती २५टक्क्यांच्या आत आणत ७३६.९ कोटी करण्यात आली आहे, ही तरतूद मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ५० टक्के कमी आहे.

Nashik Municipal Corporation
सिंहस्थ कुंभमेळा 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी पायाभूत सुविधा व सांस्कृतिक आराखडा अंतिम टप्प्यात

महापालिकेच्या २०२५-२६ च्या सुधारित अंदाज पत्रकात भांडवली खर्चाचे उद्दिष्ट वाढून १,०३१.३ वरून १,५०१.९ कोटी करण्यात आला आहे. महसुली खर्चही चालू वर्षातील १,९८२ कोटींवरून २०२६-२७ मध्ये २,२७३ कोटींवर म्हणजे ३०० कोटींनी वाढला आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात सिंहस्थ कुंभमेळ्यासंबंधी कामांचा समावेश नाही. मोठे नवे प्रकल्प प्रस्तावित नसले तरी काही सेवा-संबंधित विभागांना वाढीव निधी देण्यात आला आहे. 

उत्पन्नाच्या बाजूनेविचार करता महापालिकेलाआगामी आर्थिक वर्षात जीएसटी अनुदान १,७३८.३ कोटी रुपये, मुद्रांक शुल्क व स्थानिक उपकर यातून १२० कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. मालमत्ता कर २८५.३ कोटी,पाणीपट्टी कर ७५ कोटी, नगररचना विभागाकडून विविध करांद्वारे २२३.७ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे.

Nashik Municipal Corporation
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

महापालिकेने २०२६-२७ साठी एकूण खर्चाचा अंदाज ३,०११ कोटी रुपये असून त्यापैकी ४७१ कोटी रुपये रस्ते, पूल व इतर सार्वजनिक बांधकामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

महापालिकेने प्रभाग विकास व नगरसेवक निधीसाठी ५०.२ कोटींची तरतूद केली आहे. यात प्रभाग विकासासाठी ३९.६ कोटी आणि नगरसेवक निधीसाठी १०.६ कोटींचा समावेश आहे. 

आरोग्य विभागाच्या तरतुदीत १९.८ टक्के वाढ करून ती चालू वर्षातील ३३.८ कोटींवरून २०२६-२७ मध्ये ४०.५ कोटी करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (पूर्वीचे बिटको रुग्णालय) येथे १२ खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन इमारतीचे उन्नतीकरण करून आरोग्यसेवा वाढविण्यात येणार आहे.

Nashik Municipal Corporation
आराखडा 12 हजार कोटींचा, मग सिंहस्थासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये अवघे 1 कोटी कसे काय?

शिक्षण विभागाच्या तरतुदीत मोठी वाढ करून ती चालू वर्षातील ४ कोटींवरून २४.९ कोटी करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठीची तरतूद १३८.७ कोटींवरून १६१.८ कोटी करण्यात आली आहे. पथदीप (स्ट्रीटलाइट) साठीचा निधी २.२ कोटींवरून ५.६ कोटींवर वाढवण्यात आला आहे.

या कारणांमुळे महापालिकेच्या महसुली खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत उत्पन्न वाढीसाठी जाहिरात करात १५ टक्के वाढ करण्याच्या पलीकडे काहीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. महापालिकेला जाहिरात करातून साधारणपणे १० कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्यात वाढ केल्याने उत्पन्नावर फारसा फरक पडेल, असे दिसत नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com