आराखडा 12 हजार कोटींचा, मग सिंहस्थासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये अवघे 1 कोटी कसे काय?

कुंभमेळा आराखड्याला अद्याप मंजुरी नाही; कायदेशीर पेच टाळण्यासाठी प्रतिकात्मक तरतूद
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महापालिकेने २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १२ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला असताना २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात केवळ एक कोटी रुपयांची तरतूद कशी काय केली असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. मात्र ही तरतूद प्रतीकात्मक असून अंतिम मंजुरीअभावी महापालिकेने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Nashik Municipal Corporation
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिकेचे २०२६-२७ चे ३०१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे सादर केले आहे. या अंदाजपत्रकात सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रकल्पांसाठी केवळ एक कोटी रुपयाची तरतूद केली आहे. ही तरतूद प्रतिकात्मक आहे.

पुढच्या काळात कुंभमेळा प्राधिकरणने सिंहस्थासाठी काही नवीन प्रकल्पांना मान्यता दिल्यास त्यासाठी महापालिकेच्या हिश्शाची रक्कम देण्यासाठी काही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

Nashik Municipal Corporation
Samruddhi Expressway: 'समृद्धी'वरील नवीन इंटरचेंजबाबत 'एमएसआरडीसी'चे अधिकारीच अंधारात

सिंहस्थासाठी आतापर्येत मंजूर झालेल्या प्रकल्पांसाठी स्वहिस्सा देण्यासाठी महापालिकेने २०२५-२६ च्या सुधारित अंदाजपत्रकात ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेचा कुंभमेळाआराखड्यास मंजुरी न मिळणे व त्या आराखड्यातील कामांसाठी महापालिकेच्या हिश्शाचे प्रमाण निश्चित न होणे, या कारणामुळे महापालिकेने केवळ एक कोटी रुपयांची तरतूद करून भविष्यातील तरतूर करण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे.

नाशिक महापालिकेने २०२७ मधील सिंहस्थासाठी १२ हजार कोटींचा आराखडा तयार केला होता. त्याला मान्यता देण्यापूर्वीच राज्य सरकारने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणची स्थापना केली आहे. यामुळे कुंभमेळ्यातील वेगवेगळ्या कामांची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांचा समन्वय साधण्याची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरणाची आहे.

या कुंभमेळा प्राधिकरणाने या सर्व यंत्रणांनी तयार केलेल्या विकास आराखडे एकत्र केले असून गरज व प्राधान्यक्रमानुसार कामांना मंजुरी दिली जाते. त्यातील विविध विभागांच्या कामांना आतापर्यंत २३ हजार कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Nashik Municipal Corporation
त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीवरील 'त्या' धरणावर उभे राहणार नवे तीर्थक्षेत्र

त्यातील महापालिका हद्दीतील १३०० कोटींच्या रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय रामकाल पथ, रामझुला, रामकुंड परिसरात मलवाहिकांचे जाळे विकसित करणे, मुकणे धरण पंपिंग स्टेशनची क्षमता वाढवणे, विल्होळी येथे २७४ दशलक्ष क्षमतेचे जलकुंभ बांधणे, विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्राम जलवाहिनी टाकणे आदी कामांचा समावेश आहे.

महापालिकेने म्युनिसिपल व हरित रोखेचे प्रत्येकी २०० कोटी रुपये असे ४०० कोटी रुपये, तर दोनशे कोटी रुपये स्वनिधी, अशी ६०० कोटी रुपयांची तरतूद सिंहस्थातील कामांसाठी २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात केलेली आहे. सिंहस्थ कामांसाठी तीन वर्षात महापालिकेकडून ८२५ कोटी उपलब्ध करून देण्याचेही नियोजन केले असून २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात तशी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Nashik Municipal Corporation
सिंहस्थ कुंभमेळा 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी पायाभूत सुविधा व सांस्कृतिक आराखडा अंतिम टप्प्यात

महापालिकेचा स्वहिस्सा किती टक्के?
नाशिक येथे २०२५ मध्ये झालेल्या सिंहस्थात राज्य सरकारने महापालिकेच्या १०५० कोटी रुपयांचा आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यावेळी महापालिकेने या आराखड्यातील कामांसाठी २० टक्के स्वहिस्सा दिला होता. आगामी कुंभमेळ्यातील विकासकामांसाठी महापालिकेने २५ टक्के हिस्सा द्यावा लागेल, असे गृहित धरून नियोजन केले आहे. मात्र, महापालिकेच्या आराखड्याला अद्याप मंजुरी दिलेली नसल्याने या अंदाजपत्रकात प्रतिकात्मक तरतूद केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com