त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीवरील 'त्या' धरणावर उभे राहणार नवे तीर्थक्षेत्र

त्र्यंबकेश्वरमध्ये ९ मीटर उंच त्रिदेव मूर्ती, भव्य त्रिशूळ, बोटिंग आणि अॅम्पी थिएटर; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला मिळणार नवा आयाम
Sinhast Mahakumbh
Sinhast MahakumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पर्यटनास चालना मिळावी, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणकडून अनेक नवी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील महत्वाचा प्रकल्प म्हणजे गौतमी गोदावरी धरणातील गौतमादी हे आधुनिक तीर्थस्थळ. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे येथे गौतमी गोदावरी धरण आहे. या धरणातील बेटावर गौतमादी हा प्रकल्प साकारला जाणार असून तेथे त्र्यंबकराजाची ९ मीटर उंचीची मूर्ती साकारली जाणार असून त्यासमोर भव्य त्रिशूळ उभारले जाणार आहे.

Sinhast Mahakumbh
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

या बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असून तेथे बोटिंगचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गौतमी-गोदावरीच्या उगमस्थानाला भेट देण्याच्या पारंपरिक जागांबरोबरच गौतमी गोदावरी धरणातील गौतमादी हे ठिकाण आकर्षित करेल व त्यातून त्र्यंबकेश्वरला पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

त्र्यंबकेश्वर हे भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. येथील ब्रह्मगिरीवर दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जात असलेल्या गोदावरीचा उगम झालेला आहे. यामुळे येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच ब्रह्मगिरीवर गोदावरीचे उगमस्थान बघण्यासाठीही भाविक मोठ्यासंख्येने जात असतात. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी हा विधी करण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्र्यंबकेश्वरमधील अर्थकारण हे प्रामुख्याने या नारायण नागबळी विधीसाठी येत असलेल्या भाविकांवर अवलंबून आहे. हे भाविक येथे दोन-तीन दिवस राहतात.

Sinhast Mahakumbh
Samruddhi Expressway: 'समृद्धी'वरील नवीन इंटरचेंजबाबत 'एमएसआरडीसी'चे अधिकारीच अंधारात

या भाविकांना या काळात भेट देण्यासाठी ब्रह्मगिरी व गंगाद्वार वगळता इतर ठिकाण नाही. यामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात अंजनेरी ते ब्रह्मगिरी हा रोपवे प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय गौतमी गोदावरी धरणातील बेटावर नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरीवर गोदावरीच्या उगमाच्या कथेशी गौतम ऋषी यांचा संबंध आहे. यामुळे गौतमी-गोदावरी धरणातील या आधुनिक तार्थाला गौतमादी हे नाव देण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथे येणारा भाविक या ठिकाणी हमखास भेट देईल, या पद्धतीने त्याची उभारणी केली जाणार आहे.

या धरणातील बेट साधारणतः साडेपाच एकरचे आहे. त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या एकात्मतेचे प्रतिक समजले जाते. हे लक्षात घेऊन या बेटावर ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवाची एक भव्य कांस्य मूर्ती उभारली जाणार आहे. ही मूर्ती साधारण ९ मीटर उंचीची असणार आहे. या मूर्तीसमोर एक नंदी असून त्याच्या बाजूला भव्य त्रिशूळ उभारले जाणार आहे. या त्रिशुळाची उंची ३ मीटर असणार आहे.

Sinhast Mahakumbh
Nashik: अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे उभारणीबाबत काय आली महत्त्वाची अपडेट?

याशिवाय येथे येणा-या पर्यटकांसाठी ॲम्पी थिएटर उभारले जाणार असून तेथील आसन क्षमता १४५ असणार आहे. भाविकांना या धरणावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून बेझे फाट्यावरून एक तसेच तळवाडे फाट्यावरूनही दुसरा मार्ग आहे. गौतमी गोदावरी धरणावर आलेल्या भाविकांसाठी वाहनतळ सुविधा असणार असून तेथे एक सुंदर बगिचाही तयार केला जाणार आहे.

याठिकाणी प्रदक्षिणा मार्गही उभारला जाणार आहे. याशिवाय धरणामध्ये भाविकांना नौकाविहारची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा प्रकल्प जलसंपदा विभाग साकारणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com