Nashik : पेस्ट कंट्रोल ठेक्याला लागेना 5 वर्षांपासून मुहूर्त; तांत्रिक तपासणीत तिन्ही टेंडर अपात्र

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या मलेरीया विभागाकडून शहरातील सातपूर,सिडको, पश्चिम या विभागासाठी राबवलेल्या पेस्ट कंटोल ठेक्यासाठी प्राप्त तिन्ही टेंडर तांत्रिक तपासणीत बाद ठरले आहेत. या बाद ठरलेल्या कंपन्यांमध्ये मुंबई येथील सूरज एन्ट्रीप्रायजेस, सोबेस्ट सर्व्हिसेस व नाशिक येथील एस अॅण्ड आर यांचा समावेश आहे.

दरम्यान, मलेरिया विभागाने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने फेरटेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागाची मागील जवळपास पाच वर्षांपासून सुरू असलेली टेंडर प्रक्रिया अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही.  

Nashik Municipal Corporation
Pune : पुणेकरांना लवकरच Good News! पुण्यातून थेट अमेरिका, युरोप गाठता येणार

नाशिक महापालिकेच्या मलेरिया नियंत्रण विभागाकडून संपूर्ण शहरासाठी दिलेला पेस्ट कंट्रोलचा ठेका ऑगस्ट २०१९ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर महापालिकेच्या मलेरिया नियंत्रण विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात आधीच्या १८ कोटींच्या ठेक्याची किंमत ४६ कोटींवर पोहोचली होती. याबाबत ओरड झाल्याने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी टेंडर प्रक्रिया रद्द करून फेरटेंडर प्रसिद्ध केले. या टेंडरमध्ये सहभागी असलेल्या मेसर्स दिग्विजय एंटरप्राइजेसने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने महापालिकेच्या फेरटेंडर विरोधात निकाल दिला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यातील अनावश्यक कामांना कात्री लावून ४६ कोटींचा ठेका ३३ कोटी रुपयांपर्यंत खाली आणला. त्यातही सिडको, नाशिक पश्चिम व सातपूर विभागासाठी एक, तर नाशिक रोड पूर्व व पंचवटी विभागासाठी एक असे दोन ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सिडको, सातपूर व नाशिक पश्चिमसाठी एसआर पेस्ट कंट्रोल, तर पूर्व व पंचवटी विभागासाठी दिग्विजय एंटरप्राइजेस पात्र ठरले. मात्र, ठेका न मिळालेल्या सूरज एंटरप्राइजेसने एसआर पेस्टकंट्रोलमार्फत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना उच्च न्यायालयात आव्हान दिले.  

Nashik Municipal Corporation
Ajit Pawar : पुणेकरांना एप्रिल फूल करू नका! असे का म्हणाले अजितदादा?

टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सिडको, सातपूर व नाशिक पश्चिम या तीन विभागांच्या पेस्ट कंट्रोलच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. उच्च न्यायालयाने जूनमध्ये स्थगिती दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये टेंडर प्रक्रियाच रद्द करीत तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार महापालिकेने फेब्रुवारीत सिडको, सातपूर व नाशिक पश्चिम या विभागांसाठी धूर फवारणीची टेंडर प्रक्रिया सुरू केली. मात्र, या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या मुंबई येथील सूरज एन्ट्रीप्रायजेस, सोबेस्ट सर्व्हिसेस व नाशिक येथील एस अॅण्ड आर या तिन्ही कंपन्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्या तिघांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे.

Nashik Municipal Corporation
Sambhajinagar : चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या 'या' ऐतिहासिक वास्तुंचे रूपडे पालटणार

आता पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवली जाणार असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर मलेरिया विभागाचा भर असल्याचे सांगितले जात आहे. सातपूर,सिडको, पश्चिम या विभागांत पेस्ट कंट्रोलसाठी महापालिका तीन वर्षासाठी १९ कोटींचे टेंडर प्रसिद्ध करणार आहे. या रकमेत संबंधित ठेकेदारास औषध फवारणी. कर्मचारी, डिझेल खर्च करायचा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com