Nashik : स्वच्छता अन्‌ घंटागाडीच्या ठेक्यांवर महापालिकेचा वर्षाला 110 कोटींची खर्च

Mobile Tower
Mobile TowerTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने शहरातील रस्ते साफसफाईसाठी ३५ कोटी रुपयांचे चार यांत्रिकी झाडू खरेदी करताना महापालिकेचा स्वच्छतेवरील खर्च कमी होईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हे यांत्रिकी झाडू शहरात प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीच्या ७०० स्वच्छता कर्मचारी ठेक्याला मागील महिन्यात आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असतानाच आता घनकचरा विभागाने आणखी १७५ सफाई कर्मचारी वाढवले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या प्रस्तावास महासभेने मंजुरी दिली आहे. यामुळे ३५ कोटींचे यांत्रिकी झाडू दिमतीला असताना घंटागाडी, वॉटरग्रेसचे स्वच्छता कर्मचारी असा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा खर्च आता वर्षाला ११० कोटींपेक्षा अधिक होणार असून, या माध्यमातून केवळ ठेकेदार पोसले जात असल्याचे बोलले जात आहे.
   

Mobile Tower
समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात होणार पूर्ण कारण...

महापालिकेकडे २०२० पासून सातशे सफाई कर्मचारी आउटसोर्सिंगने कार्यरत असतानाच महापालिकेने आणखी १७५ कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेऊन महासभेने त्याला मान्यताही दिली आहे. यामुळे आधीच्या वॉटरग्रेसच्या कंत्राटी कर्मचारी संख्या ८७५ वर पोहोचली आहे. या ८७५ सफाई कर्मचाऱ्यांवर दरवर्षी ३५ कोटींचा खर्च होणार असून, पाच वर्षांत ही रक्कम १७५ कोटींवर पोहोचणार आहे. महासभेने यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली असून, प्रशासनाकडून आता टेंडर प्रसिद्ध केले जाणार असून तोपर्यंत वॉटरग्रेसच्या ठेक्याला यापूर्वीच मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

नाशिक शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरता पालिकेकडे सध्या साफसफाईसाठी असलेले १९७५ कर्मचारी कमी पडत असल्यामुळे पालिकेने सफाईचे ७०० कर्मचारी आउटसोर्सिंग केले होते. त्यात आता शिक्षण विभागाने शाळांसाठी, मिळकत विभागाने नाट्यगृहे आणि जलतरण तलावासाठी सफाई कर्मचाऱ्याची मागणी केली आहे. त्यानुसार महाकवी कालिदास महात्मा फुले कलादालन, मनपाची सर्व नाट्यगृहे, सभागृहे, जलतरण तलाव आदी ठिकाणी उपस्थितांची संख्या, नियमित होणारे कार्यक्रम तसेच मनपा शाळांची शौचालये, स्वच्छतागृहे या सर्वसाफसफाईसाठी साधारणतः १७५ कंत्राटी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

Mobile Tower
Nashik : आधीच अडचणीत असलेल्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राला कोणी पाठवली जप्तीची नोटीस?

या कर्मचारी भरतीस महासभेने मंजुरी दिली. यामुळे आधीचे ७०० व नवीन १७५ असे ८७५ कंत्राटी कर्मचारी आउटसोर्सिंगने पुरवण्यासाठी ठेकेदार नियुक्तीसाठी टेंडर समिती गठीत करण्यात आली असून, या समितीची २५ जानेवारीस बैठक होऊन दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेकरीता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटदाराकडून प्रति दिन आवश्यक कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबत पाच वर्ष कालावधीकरीता ई-टेंडर प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला महासभेने मंजूरी दिली आहे.

Mobile Tower
Nagpur : कामठीतील 'त्या' उड्डाणपुलाचे काम का रखडले? 2 आमदार करतात काय?

महापालिका पाच वर्षांसाठी दरवर्षी ठेकेकादाराकडून ८७५ सफाई कर्मचारी  घेणार आहे. त्यासाठी प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला २५ हजार १४१ रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. त्यापोटी ३० कोटी ८८ लाख रुपयांचा वार्षिक खर्च येणार आहे, तर ठेकेदाराला तीन कोटी आठ लाखांचा मेहनताना दिला जाणार आहे. वर्षाला ३३ कोटी ९७ लाख याप्रमाणे पाच वर्षासाठी १७० कोटींचा खर्च येणार आहे.

येथे नेमणार १७५ स्वच्छता कर्मचारी
महापालिकेची सर्व नाट्यगृहे, सभागृहे : ८२
जलतरण तलाव : १२
मनपा शाळा : ८१

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com