Nagpur : कामठीतील 'त्या' उड्डाणपुलाचे काम का रखडले? 2 आमदार करतात काय?

Kamthi
KamthiTendernama

नागपूर (Nagpur) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विकास कामांच्या निधीतून कामठी मतदारसंघातील रमानगर रेल्वे उड्डाणपूल (Railway Flyover) बांधकामासाठी 65 कोटी 29 लाख मंजूर झाले. पुलाचे बांधकामही सुरू झाले. आज सात वर्षे झाली तरी पुलाचे बांधकाम काही संपेना. दोन - दोन आमदार असूनही उड्डाणपुलाचे काम रखडल्याने मतदार लोकसभा निवडणुकीची वाट पाहत आहेत.

Kamthi
Nashik : पालकमंत्र्यांनी आमदारांना दिलेला शब्द पाळला; लोकसभेमुळे 5 मार्चपूर्वीच उरकले...

रमानगर उड्डाणपूल बांधकामाची मुदत सात वर्षे होती. मुदत संपूनही पूल काही पूर्ण झाला नाही. आजनी रेल्वे फाटक बंद करून भुयारी पुलाचे बांधकाम सुरू आहे. या मार्गावरून जडवाहतूक बंद असल्याने शालेय बसेस, शेतमाल वाहून नेणारी शेतकऱ्यांची वाहने नेताना सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 

कामठी मतदारसंघाला दोन - दोन आमदार असतानाही गेल्या सात वर्षांत साध्या पुलाचेही बांधकाम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दोन्ही पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या मागणीसाठी काँग्रेस पक्षतर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.

Kamthi
PWDत विक्रमी वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण; 1518 उमेदवारांना नियुक्तीपत्रे

भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, काँग्रेसचे माजी कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव, कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल इटकेलवार, काँग्रेस पदाधिकारी इर्शाद शेख, राशीद अन्सारी, कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, माजी नगरसेवक नीरज लोणारे, माजी सरपंच प्रवीण कुत्थे, धीरज यादव, प्रमोद गेडाम, नरेंद्र शर्मा, राजकुमार गेडाम, प्रमोद खोब्रागडे, आशिष मेश्राम आदी उपस्थित होते.

Kamthi
Eknath Shinde : 'त्या' गावांना मुख्यमंत्र्यांनी दिली Good News! उल्हासनगरची अनधिकृत बांधकामेही नियमानुकूल करणार

विद्यार्थी, शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास :

रमानगर उड्डाणपुलाच्या कामाची नियोजित मुदत 2020 पर्यंत होती. कोरोनामुळे काम रखडले होते, पण 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा कालावधी वाढवून देण्यात आला. ही मुदत संपली तरी पुलाचे काम काही झाले नाही. रेल्वे फाटक बंद असल्याने या मार्गावरील वाहनांना पावनगाव मार्गाने जावे लागते. याचा सर्वांत जास्त त्रास शेतकरी आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com