Nashik : महापालिकेचा यांत्रिक झाडूंचा दसऱ्याचा मुहूर्त टळला; दिवाळीनंतरच येण्याची शक्यता

Electric Broom
Electric BroomTendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी इटली येथील कंपनीकडून खरेदी केलेल्या ३३ कोटींच्या चार यांत्रिकी झाडूंचा दसऱ्याचा मुहुर्त टळल्यानंतर आता दिवाळीचीही मुदत हुकण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील बंदरवर ही यंत्रे  पुढील आठवड्यात येणार असून, तेथे  तपासणी, चाचणी व प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीच्या प्रक्रियेला १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकणार असल्याने प्रत्यक्ष यंत्रांचा वापर दिवाळनंतरच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Electric Broom
Mumbai : काम सुरू होऊन तब्बल सव्वा वर्षानंतर बीएमसीला हवा सल्लागार; 47 कोटींचे टेंडर

नाशिक महापालिकेने केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या निधीतून ३३ कोटी रुपये खर्च करून चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया राबवून एप्रिलमध्ये अहमदाबाद येथील ओम स्वच्छता कॉर्पोरेशन या मक्तेदारामार्फत इटलीहून ही यंत्रे खरेदी करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. या सहा महिन्यांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत असल्याच दसऱ्याच्या मुहूर्तावर ही यंत्रे नाशिकमध्ये आणली जाणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र,अद्यापही ही यंत्रे मुंबईतील बंदरावर येऊ शकलेली नाहीत. साधारणतः आठवडाभरानंतर ही यंत्रे मुंबई बंदरावर आणली जातील. त्यानंतर त्यांची प्रारंभी तपासणी केली जाईल. नंतर चाचणी करून प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीची प्रक्रिया केली जाईल. त्यानंतरच ही यंत्रे रस्त्यांवर स्वच्छतेसाठी उतरवली जाणार आहेत. त्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही यंत्रे कार्यान्वित होऊ शकतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Electric Broom
Nashik : सर्वाधिक मागास सुरगाण्याला केवळ 76 लाख; तर मंत्री दादा भुसेंच्या मालेगावला सव्वातीन कोटींची कामे

देखभाल-दुरुस्ती ठरणार डोईजड
महापालिकेने खरेदी केलेल्या या चारही यांत्रिकी झाडूंची मूळ किंमत १२ कोटी असताना या यंत्रांची देखभाल-दुरुस्ती व संचलनावरच तब्बल २१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. आहेत. त्यामुळे या यंत्रांची देखभाल व दुरुस्ती पालिकेला आगामी काळात डोईजड ठरणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान प्रहार संघटनेने या यंत्र खरेदीला विरोध केला आहे. या यंत्राच्या देखाभालीवरील खर्चाला प्रहारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदनही दिलेले आहे. त्यामुळे ही यंत्र आल्यानंतर त्यांच्या देखभालीवरील खर्च वादात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com