नाशिक मनपा उभारणार सौर ऊर्जेचे 3 प्रकल्प;आता 'येथे' सौरविजेचा वापर

Nagpur
NagpurTendernama

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून महापालिकेकडून सौर ऊर्जेवरचे तीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शहरातील सर्व सार्वजनिक शौचालय घंटागाडी पार्किंगची सर्व ठिकाणे व शहरातील सर्व ४८ सिग्नल यासाठी सौरऊर्जेची वीज वापरली जाणार आहे. या तीनही ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी साधारणपणे दोन-अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या सौरऊर्जेवरील प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज वापरात बचत होऊन औष्णिक वीज निर्मिती कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.

Nagpur
BMCसाठी शिंदे-फडणवीसांचे 'होऊ दे खर्च'! 1700 कोटींचा चुराडा करून..

हवेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने अपारंपारिक विजेचा वापर वाढवण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. यामुळे केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून सौर वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या विद्युत विभागाने घेतला आहे यानुसार शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांवर वीजनिर्मितीसाठी सौर पॅनल बसवण्यात येणार असून त्यातून तयार होणाऱ्या होणाऱ्या विजेचा वापर केला जाईल. नाशिक महापालिका हद्दीत ११३ सार्वजनिक शौचालये असून प्रत्येक ठिकाणी १.३५ लाख रुपये याप्रमाणे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Nagpur
शिंदे सरकारकडून 'या' आमदाराची कोंडी; 41 कोटींचे कामे रोखली

नाशिक शहरातील सिग्नलचे  सिंक्रोनायझेशन करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला आहे. यासाठी प्रत्येक सिग्नलवर त्यासाठी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठी सौरवीज वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात  ४८ सिग्नलचे सिंक्रोनायझेशन माध्यमातून वाहनधारकाला विनाअडथळा अनेक सिग्नल पार करता येणे शक्य होणार आहे. नाशिक शहरात ४८ सिग्नल असून त्यापैकी २२ सिग्नलचे सिंक्रोनायझेशन केले जाणार आहे. एका सिग्नलवर सौजवीज निर्मिती करण्यासाठी दोन लाख २५ हजार रुपये खर्च येणार आहे. यामुळे या सिंक्रोनायझेशनसाठी सौरवीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाी ५० लाख रुपये खर्च येणार आहे.

Nagpur
नाशिक : 'ही' चूक भोवली; 'स्वच्छ सर्वेक्षण'च्या क्रमवारीत घसरगुंडी

नाशिक शरातील घंटगाडी प्रकल्पातील घंटागाड्यांसाठी शहरातील सर्व घंटागाडी पार्किंगवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात येणार असून या सीसीटीव्हीला लागणारी वीज सौरऊर्जा प्रकल्पातून उत्पादित केली जाणार आहे. शहरात सहा विभागात घंटागाडीचे पार्किंग केंद्र आहेत. नाशिक रोड विभागात सर्व्हे क्रमांक २४६ महापालिका बस डेपो, पश्चिम विभागात सर्व्हे क्रमांक ४०६ कन्नमवार पुलाजवळ, सिडको भागात खत प्रकल्पाशेजारी, पंचवटी भागातील एसटीपी शेजारी तपोवन व महापालिकेच्या खत प्रकल्पावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. एका सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सहा ठिकाणी मिळून ३० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. महापालिकेकडून या सौरऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com