सिंहस्थ कुंभमेळा ठरणार गुंतवणुकीचा 'गेमचेंजर'; नाशिक जिल्ह्याचा होणार औद्योगिक कायापालट; 18 हजार कोटींच्या...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांमुळे नाशिक बनले 'इन्व्हेस्टमेंट हब'; हॉटेल ताजमध्ये दिग्गज उद्योजकांचा मेळावा
Nashik, Startup
Nashik, StartupTendernama
Published on

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या पायाभूत सुविधांचा कायापालट होत असतानाच, आता जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला मोठी उभारी मिळणार आहे. ६ मे २०२६ रोजी हॉटेल ताज येथे 'कुंभ उद्योग संगम' आणि 'नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट'चे आयोजन करण्यात आले असून, याद्वारे सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.

Nashik, Startup
मंत्री नरहरी झिरवाळांची 'ती' मागणी सरकारने केली पूर्ण?

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ६ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हॉटेल ताज, नाशिक येथे 'कुंभ उद्योग संगम' ही परिषद पार पडणार आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

१० हजार कोटींची गुंतवणूक प्रत्यक्षात

गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी जवळपास १८ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. त्यातील जागा निश्चिती आणि परवानग्यांच्या तांत्रिक बाबी पूर्ण होत असून, १० हजार कोटींची गुंतवणूक आता प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार आहे. सामंजस्य करारानंतर उद्योग प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी साधारण तीन वर्षांचा कालावधी लागतो, त्याप्रमाणे येत्या दोन वर्षांत अनेक नवीन प्रकल्प कार्यान्वित होतील, असा विश्वास कुशवाह यांनी व्यक्त केला.

Nashik, Startup
Nashik: सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांसाठी काय आली गुड न्यूज?

DMIC आणि नाशिकचा समावेश

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) पहिल्या टप्प्यात पाणी उपलब्ध नसल्याच्या तांत्रिक कारणास्तव नाशिकऐवजी छत्रपती संभाजीनगरचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता केंद्र सरकारकडून निश्चित केल्या जाणाऱ्या पुढील टप्प्यातील ठिकाणांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नाशिकला औद्योगिक नकाशावर अधिक ठळक स्थान प्राप्त होणार आहे.

Nashik, Startup
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; तब्बल 316 कोटी वाया जाणार

पायाभूत सुविधांचा फायदा

कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये दळणवळणाची साधने, महामार्ग आणि कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. या प्रक्रियेत विविध कामांसाठी काढण्यात येणाऱ्या टेंडर मुळे स्थानिक उद्योजकांनाही फायदा होणार आहे. जिल्ह्यातील वातावरण उद्योगस्नेही असल्याने भविष्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी नमूद केले. या परिषदेत विविध विषयांवर परिसंवाद आणि नवीन सामंजस्य करार होणार असून, याद्वारे नवउद्योजकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Nashik, Startup
CM Devendra Fadnavis यांनी नाशिक जिल्ह्याला काय दिली गुड न्यूज?

Key Points Summary

  • ६ मे २०२६ रोजी हॉटेल ताज, नाशिक येथे 'कुंभ उद्योग संगम' परिषदेचे आयोजन.

  • साधारण १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रत्यक्षात जमिनीवर उतरणार.

  • दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) आगामी टप्प्यात नाशिकचा समावेश निश्चित.

  • कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांमुळे नाशिकमध्ये उद्योगस्नेही वातावरण निर्माण.

  • परिषदेत नवीन सामंजस्य करार आणि विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन.

Tendernama
www.tendernama.com