Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मेगा प्लॅन! टेन्ट सिटी अन् ज्योतिर्लिंग जोडणारी हेलिकॉप्टर सेवा

राज्याच्या पर्यटन विभागाकडून उभारली जाणार चार ठिकाणी टेन्ट सिटी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4 टेन्ट सिटी
Kumbh MelaTendernama
Published on

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी राज्याच्या पर्यटन विभागानेही मेगाप्लॅन तयार केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4 टेन्ट सिटी
Nashik ZP: जलयुक्त टेंडर घोटाळा! ठेकेदार एक कामे दोन; एकात पात्र मात्र दुसऱ्यात अपात्र

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणा-या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या अवतीभोवती चार टेन्ट सिटी उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर या पाच जोतिर्लिंगांचे अध्यात्मिक सर्किट तयार करून हे पाचही ज्योतिर्लिंग हेलिकॉप्टर सेवेने जोडण्यात येणार आहेत.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकास कामांना गती देण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

त्यानंतर प्राधिकरणाच्या माध्यमातून टेन्ट सिटी उभारणीसाठी करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी संजय खंदारे यांनी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (छत्रपती संभाजीनगर) आदींशी दूरभाष प्रणालीद्वारे संवाद साधला.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4 टेन्ट सिटी
Nashik Airport: सिंहस्थापूर्वी 1000 कोटी खर्चून नाशिक विमानतळाचा होणार कायापालट

यावेळी त्यांनी पर्यटन विभागाने सिंहस्थात प्रस्तावित केलेल्या कामांचा आढावा घेतला. प्रधान सचिव श्री. खंदारे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या टेन्ट सिटीच्या सर्वांगीण तयारीचा आढावा घेतला. 

खंदारे यांनी दिलेल्या सूचनांनुसार सिंहस्थ कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग करण्यासाठीही पर्यटन विभागाने मोठी तयारी केली असल्याचे दिसून आले आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात गुजरातमधील सापुतारा, पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा, समृद्धी महामार्गालगत टेंट सिटी उभारण्यात येणार आहे. 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4 टेन्ट सिटी
नाशिक जिल्ह्यात पहिल्या 50 कृत्रिम वाळू युनिटसाठी सवलती

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना या टेंटसिटीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नाशिकजवळील टेन्ट सिटीसाठी त्र्यंबक रोडवरील खादी ग्रामोद्योगाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या टेन्ट सिटीच्या ठिकाणी प्रदर्शन केंद्र उभारले जाणार आहेत.

याशिवाय कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या भागातून येणा-या भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर जवळ पर्यटन क्लस्टर विकसित केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास वन विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे.

नाशिक शहराजवळ सिंहस्थ काळात कलाकुंभ उभारला जाणार असून या कलाकुंभमध्ये स्थानिक कारागीर, स्वयं-साहाय्य गट आणि हस्तकला व्यावसायिकांसाठी दुकाने उपलब्ध करून देता येतील. त्यात राज्य मंडप, कुंभ संग्रहालय, नदी मंडप, एक जिल्हा एक उत्पादनाची दुकाने, खुले थिएटर, कला प्रदर्शन असणार आहे. 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 4 टेन्ट सिटी
Nashik: महापालिका निवडणुकीपूर्वी रस्ते दुरुस्तीचा दुसरा राऊंड; 125 कोटी खर्चून...

अध्यात्मिक सर्किट

राज्यात औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर हे पाच ज्योतिर्लिंग आहेत. सिंहस्थासाठी आलेल्या भाविकांना या पाचही ज्योतिर्लिंंगाचे दर्शन घेण्याची सुविधा देण्यासाठी पर्यटन विभागाने या पाच ज्योतिर्लिंगांचे अध्यात्मिक सर्किट तयार करण्याच निर्णय घेतला आहे. हे अध्यात्मिक सर्किट हेलिकॉप्टर सेवेने जोडले जाणार आहे.

याशिवाय नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्टची क्षमता खासगी भागिदारांच्या सहभागातून वाढविण्यात येणार आहे. जोतिर्लिंग आणि कुंभ पर्यटनाच्या ब्रॅण्डिगसाठी एक समान आराखडाही कुंभमेळा प्राधिकरणाकडून तयार करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com