Nashik Airport: सिंहस्थापूर्वी 1000 कोटी खर्चून नाशिक विमानतळाचा होणार कायापालट

ओझर विमानतळावर एचएएल ६०० कोटी रुपये खर्चून समांतर धावपट्टी, प्रगत उपकरणांची खरेदी, रडार आणि हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) प्रणाली सुधारणा करणार आहे
Nashik Airport Ozar
Nashik Airport OzarTendernama
Published on

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र सरकार ५५० कोटी रुपये, तर संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम असलेली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ६०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Nashik Airport Ozar
Nashik Parikrama Marg: नाशिक शहराच्या रिंगरोडबाबत सरकारकडून दोन मोठे बदल

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य सरकार ५५० कोटी रुपये खर्च करणार आहे. यात नवीन टर्मिनल इमारत आणि संबंधित सुविधांचा समावेश आहे. नवीन टर्मिनल विद्यमान इमारतीच्या शेजारी बांधले जाईल. याशिवाय, सहा अतिरिक्त पार्किंग बे आणि चार एरोब्रिज बांधण्यात येणार आहेत. नवीन टर्मिनल प्रवाशांच्या प्रस्थानासाठी, तर विद्यमान इमारत आगमनासाठी वापरली जाईल.

या विस्तारीकरणाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

Nashik Airport Ozar
MSRTC: इलेक्ट्रिक बस खरेदीचा निर्णय महामंडळाच्या अंगलट आलाय का?

'एचएएल'ची गुंतवणूक 

ओझर विमानतळावर एचएएल ६०० कोटी रुपये खर्चून समांतर धावपट्टी, प्रगत उपकरणांची खरेदी, रडार आणि हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) प्रणाली सुधारणा करणार आहे. सध्या विमानतळाचे टर्मिनल ३०० प्रवाशांना सामावून घेते, परंतु नवीन टर्मिनलची १,००० प्रवाशांसाठी बसण्याची क्षमता असेल.

एचएएलने नवीन धावपट्टीच्या विकासासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, रडार प्रणाली आणि इतर ATC सुधारणांसाठी २०० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

Nashik Airport Ozar
Nashik: ठेकेदारांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एका ठेकेदाराची नियुक्ती

नाशिक शहरापासून २० किमी अंतरावर जानोरी येथे असलेले हे विमानतळ २०१३-१४ मध्ये राज्य सरकार आणि एचएएल यांनी संयुक्तपणे ९४ कोटी रुपये खर्चातून विकसित केले आहे. सध्याची धावपट्टी ३ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद आहे. एचएएल आता विद्यमान धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी बांधत आहे, जी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होईल.

कुंभमेळ्याची तयारी 

सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान नाशिक विमानतळावर दर तासाला १,००० प्रवाशांची वर्दळ अपेक्षित आहे. यासाठी नवीन टर्मिनलची देखभाल एचएएल करणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नाशिक विमानतळाची क्षमता वाढणार असून, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुविधा पुरवणे सोपे होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com