Nashik Kumbh Mela 2027: सिंहस्थानिमित्त इगतपुरी, त्र्यंबकमध्ये होणार 3 पर्यटनस्थळांचा विकास

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ, इगतपुरी तालुक्यातील कावनई व सर्वतीर्थ टाकेद या पर्यटनस्थळांची निवड
Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela 2027 LogoTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प मंजूर झाले असून पर्यटनाला चालना देण्यासाठीही अनेक कामे मंजूर करण्यात आले आहेत. या सिंहस्थाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ व इगतपुरी तालुक्यातील कावनई व सर्वतीर्थ टाकेद या पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Dwarka Chowk Nashik: नाशिककरांना दिलासा! द्वारका चौकातील वाहतूक 5 महिन्यांनंतर...

ही कामे करताना भाविकांसाठी सोईसुविधा उभारतानाच त्या परिसराचे सुशोभिकरण करताना मध्ययुगीन बांधकाम शैलीचा वापर केला जाणार आहे. यामुळे पुढील काळात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळांमध्ये या तीन ठिकाणांचाही समावेश होणार आहे. या कामांसाठीचे ८१ कोटींचे टेंडर प्रसिद्ध झाले असून ही कामे पुढच्या सिंहस्थापूर्वी पूर्ण केले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यात नाशिकचा गंगाघाट परिसर, त्र्यंबकेश्वर व श्री सप्तश्रृंग गड ही प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक विकासकामे मंजूर केली असून त्यात पर्यटनाला चालना देणा-या कामांचाही समावेश आहे. या बरोबरच धार्मिक व पौराणिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कावनई, टाकेद व चक्रतीर्थ या तीन ठिकाणांचाही विकास करून तेथील पर्यटनवाढीसाठी कुंभमेळा प्राधिकरणने आराखडा तयार करून त्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत.

Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela Infra: वेळेचे गणित हुकणार? अवघे 10 महिने शिल्लक! कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांचा वेग मंदावलाय का?

या ठिकाणी कामे करताना भाविकांना सुविधा देण्याबरोबरच त्या परिसराचे सुशोभिकरणकरण ही कामे केली जाणार आहेत. त्यात त्या कामांची शैली मध्ययुगीन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी दिल्ली येथील संस्थेकडून आराखडा तयार करून घेतला आहे. तसेच या कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचीही नेमणूक केली जाणार आहे.

ही कामे केल्यानंतर नाशिक येथे येणा-या पर्यटकांना धार्मिक व पौराणिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी जाण्याचा व नैसर्गिक पर्यटनाचाही आनंद घेता येणार आहे. ही तीनही ठिकाणे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असून या सोईसुविधांमुळे तेथील पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela Nashik 2027: कुंभमेळा आयुक्तांनी ठेकेदारांना काय दिले आदेश?

ही होणार कामे...

कावनई : इगतपुरी तालुक्यातील कावनई हे कपिलमुनींची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. हा परिसर अत्यंत सुंदर असून तेथे पर्यटकांचा ओढा आहे. मात्र, या ठिकाणी पर्यटनात आणखी वाढ व्हावी यादृष्टीने तेथे घाट, पाय-या, प्रवेशद्बार, भक्तनिवास, वस्त्रांतर गृह, भूमिगत जलनिस्सारण कामे,  संगितकक्ष, ग्रंथालय, संरक्षक भिंत, पाणीपुरवठा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, बगिचा, बैठकव्यवस्था, भूमिगत पाण्याची टाकी, विद्युतीकरण, स्ट्रीट लाईट, पादचारी दिवे व बोलार्ड लाईट आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी ४१.१२ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Kumbh Mela 2027 Logo
Kumbh Mela Infra: वेळेचे गणित हुकणार? अवघे 10 महिने शिल्लक! कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांचा वेग मंदावलाय का?

टाकेद : रामायणातील रावण व जटायू यांच्यातील लढाई झालेले ठिकाण म्हणजे टाकेद. याठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. याशिवाय वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. याठिकाणी पर्यटनात आणखी वाढ व्हावी, यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणने तयार केलेल्या आराखड्यात पर्यटकांसाठी सुविधा उभारून परिसराचे सुशोभिकरण करण्यास प्राधान्य दिले आहे.

टाकेद येथे इमारत बांधकामे,स्वयंपाकगृह,खुला रंगमंच, सार्वजनिक स्वच्छतागृह, प्रवेशद्वार, पाणीपुरवठा व स्वच्छता, पावसाच्या पाण्याचे संकलन, विद्युतीकरण, बाह्य पायऱ्या व घाट, बाह्य कर्ब भिंत, संरक्षण भिंत, भूमिगत जलनिस्सारण कामे, उंच पादचारी मार्ग, स्ट्रीट लाईट, पादचारी दिवे व बोलार्ड लाईट, कचरापेट्या, बैठक व्यवस्था,  बगिचा, सभागृह व दुकानांचे नूतणीकरण साधू निवासाचे नूतनीकरण,मंदिराचे नूतनीकरण आदी १७.६९  कोटींची  कामे केली जाणार आहेत.

Kumbh Mela 2027 Logo
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यातील हजारो कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात

चक्रतीर्थ : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे या गावात गोदावरीच्या पात्रात चक्रतीर्थ आहे. या ठिकाणी या कुंडातून बाराही महिने गोदावरी वाहती असते. त्र्यंबकेश्वर येथे गोसावी व बैरागी यांच्या आखाड्यांच्या साधूंमध्ये १८७० च्या सिंहस्थात झालेल्या रक्तपातानंतर बैरागी साधूंनी त्यावर्षी पुढच्या पर्वणीला याच ठिकाणी शाहीस्नान केले, अशी मान्यता आहे. मात्र, या ठिकाणी भाविकांसाठी कोणत्याही सोईसुविधा नाही. यामुळे तेथे भाविक फार जात नाहीत. मात्र, या ठिकाणी पर्यटनवाढीची मोठी संधी आहे. यामुळे कुंभमेळा प्राधिकरणने या तीर्थस्थळाचा विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  

याठिकाणी पायऱ्या, घाट, बाह्य कर्ब भिंत, संरक्षण भिंत, भूमिगत जलनिस्सारण कामे, कॅन्टिलिव्हर प्लाझा स्ट्रीट लाईट, पादचारी दिवे, बोलार्ड लाईट, कचरापेट्या, बैठक व्यवस्था, पूल, गार्डन, मंदिराचे नूतनीकरण, शाळा बांधणे ही कामे प्रस्तावित केली असून त्यासाठी २२.४१ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Tendernama
www.tendernama.com