Kumbh Mela Nashik 2027: कुंभमेळा आयुक्तांनी ठेकेदारांना काय दिले आदेश?

सिंहस्थ कामाच्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाय करण्याचे निर्देश
Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Simhastha Maha Kumbh Mela, nashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात हजारो कोटींची कामे सुरू आहेत. या सर्व विकासकामांमध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने दिले आहेत.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Nashik Kumbh 2027: 'त्या' 18 ठेकेदारांना दणका; रस्त्यांची केवळ 15 टक्केच कामे पूर्ण

प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक जारी केले असून, सर्व विभाग, कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणांना ३१ मे २०२६पर्यंत कामे पूर्ण करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी अंतर्गत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, ड्रेनेज, घाट, पाणीपुरवठा आणि विविध नागरी सुविधा विकासाची कामे सुरू आहेत. यातील प्रामुख्याने शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे सुरू असून तत्पूर्वी तेथे युटीलिटी डक्ट उभारण्याचे कामे सुरू आहेत. त्यासाठी त्या रस्त्यांवरील वाहतूक एकेरी सुरू आहे.

यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यात पाऊस सुरू झाल्यानंतर आधीच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांची परवड वाढणार आहे. यामुळे कुंभमेळा आयुक्तांनी पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्देश दिले आहेत.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Nashik Kumbh: Good News! नाशिक - त्र्यंबकेश्वरमधील 'ते' महत्त्वाचे काम 50 टक्के पूर्ण

परिपत्रकानुसार सर्व बांधकाम साहित्य, माती, स्क्रॅप व ढिगारे तातडीने हटविणे किंवा सुरक्षितरीत्या साठवण्याच्या सूचना दिल्य़ा आहेत. खोदकाम किंवा सखल भागांमधील यंत्रसामग्री व साहित्य स्थलांतरित करण्याच्या सूचना असून कामांच्या परिसरातील नाले, पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या आणि क्रॉस ड्रेनेज व्यवस्था तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांवर किंवा वाहतुकीच्या मार्गांवर मुरूम, माती किंवा साहित्य राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगितले आहे.

खोदकाम व ट्रेंचिंग करण्यात आलेल्या भागांभोवती मजबूत बॅरिकेडिंग, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टेप्स, साइनबोर्ड आणि आवश्यक प्रकाशयोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूरप्रवण भागांमध्ये उच्च क्षमतेचे डी-वॉटरिंग पंप पूर्वतयारीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Nashik: सिंहस्थासाठी लावणार ऑलिम्पिक दर्जाचे दिशादर्शक फलक

प्रत्येक कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणेला पूरस्थिती समन्वयासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बीटी साहित्य, पेव्हर ब्लॉक्स आणि दुरुस्ती साहित्यांसह आपत्कालीन प्रतिसाद वाहन सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विद्युत यंत्रणा व वायरिंग पाण्यापासून सुरक्षित ठेवणे, तसेच नाल्यांलगत वाढलेली झाडाझुडपे हटवून पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मैदानी अधिकाऱ्यांना नियमित पाहणी करून स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आपत्कालीन सेवांशी सातत्याने समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करून त्याचा अहवाल छायाचित्रांसह ३१ मे पर्यंत कुंभमेळा प्राधिकरणला सादर करण्यास सांगण्यात आला आहे.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Kumbh Mela Nashik 2027: IIT मुंबई तपासणार कुंभमेळ्यातील कामांची गुणवत्ता

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू आहे. मात्र विकासकामांच्या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यालाही आम्ही तितकेच प्राधान्य देत आहोत. प्रत्येक यंत्रणेसाठी हे सुरक्षा निकष बंधनकारक असतील. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बाधित होता कामा नये.

- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

Tendernama
www.tendernama.com