Nashik: जलवाहिन्या फोडणाऱ्या कंत्राटदारांना दणका; 26 लाख...

Nashik City, nmc
Nashik City, nmcTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात रस्त्यांची कामे मोठ्याप्रमाणावर सुरू आहेत. या कामांसोबतच विविध प्रकारच्या केबल्स व जलवाहिनी, मलवाहिका टाकण्याचीही कामे सुरू आहेत. ही कामे करताना मार्च अखेरपर्यंत ५५ ठिकामी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे त्या त्या भागातील पाणीपुरवठा विस्कळित होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Nashik City, nmc
Nashik: महापालिकेत शासन निर्णयाची 5 वर्षांनी अंमलबजावणी? 10 लाखांपर्यंतची कामे आता विनाटेंडर

यामुळे अखरे पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदारांना दंडाच्या नोटीसा पाठवल्या आहेत. या ठेकेदारांकडून व्यावसायिक दराने पाचपट दंड आकारणी करून जवळपास २६ लाख १६ हजार ३०० रुपये वसुली केला जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने नाशिक शहरात २८ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यापूर्वी त्या भागातील विविध प्रकारच्या केबल्स, जलवाहिनी, कॅमेरा केबल्स यासाठी डक्ट तयार करण्याची कामे केली जात आहेत. त्यानंतर कॉंक्रिटीकरण टाकण्याचे काम केले जातात. ही कामे करताना ठेकेदारांनी तेथील आधीच्या स्ट्रक्चरचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र, काम करताना त्यांनी दाखवलेल्या बेफिकीरीमुळे कामे करताना मार्चअखेरपर्यंत ५५ ठिकाणी जलवाहिन्या फुटून गळती झाल्याने लाखो लिटर पाणी तर वाया गेलेच, त्याशिवाय नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागले.

Nashik City, nmc
Nashik: लाचखोर वैशाली ठाकरेच्या अटकेने ठेकेदारांचे 20 लाख बुडाले?

जलवाहिनी तुटल्याने पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. महासभेतदेखील या विषयावर वादळी चर्चा झाली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने या जलवाहिन्यांची तोडफोड केलेल्या १६ कंत्राटदार संस्थांना नोटिस पाठवून नुकसान भरपाई मागितली आहे.

व्यावसायिक पाण्याचा दर २७ रुपये प्रति हजार लिटर आहे. त्या अनुषंगाने या ठेकेदारांकडून जवळपास २६ लाख १६ हजार ३०० रुपये वसुलीच्या नोटीसा कंत्राटदार संस्थांना पाठवल्या आहेत. या नोटीसांमुळे रस्त्यांची कामे करीत असलेले ठेकेदार आता काळजीपूर्वक कामे करून नागरिकांची गैरसोय करणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Nashik City, nmc
Nashik: महापालिकेच्या Missing Links बाबतच्या प्रस्तावाला सरकारकडून प्रतिसादच नाही

या कंत्राटदार कंपन्यांवर कारवाई
एनसीसी, जिंदाल, लक्ष्मी सिव्ही इंजिनिअरिंग, एमएनजीएल, इगल इन्फ्रास्ट्रक्चर्स, स्मार्ट सिटी, मे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, मे. ए. के. शिवतारे इन्फ्रा. प्रा. लि., मे. स्वस्तिक इन्फ्रालॉजिस्टीक, जयकुमार जलोरी, सोरटीया कन्स्ट्रक्शन, खताळे कन्स्ट्रक्शन, एस.बी. देशमुख, बीएसएनएल, एअरटेल, सचिन शिंदे.

जलवाहिन्यांची तोडफोड विभागनिहाय
पूर्व विभाग : वडाळगाव चौफुली, कलानगर, वडाळगाव मारुती मंदिर, जयशंकर चौक, संत सावतामाळीनगर.
पश्चिम विभाग : संभाजी चौक, शगून हॉटेलसमोर, शरणपूर पोलिस चौकी, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, महात्मानगर, आरटीओ जलकुंभाजवळ.
 पंचवटी : ड्रीम कॅसल इमारतीजवळ, मेरी रासबिहारी लिंकरोड, मेरी जागा, नांदूर नाका ते गोदावरी पूल, हनुमान नगर, निलगिरी बाग रोड, डाळिंब बाग मार्केट, तारवालानगर सिग्नल.
नाशिक रोड : महाजन हॉस्पिटलजवळ, नाशिक रोड पोलिस स्टेशन परीसर, खोलेमळा, गवळीवाडा परीसर, विहितगाव सिग्नल परिसर.
सातपूर : ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज शेजारी, भवर टॉवर बसस्टॉप, शिवाजीनगर, ध्रुवनगर बसस्टॉप, मोतीवाला कॉलेजसमोर, शिवशक्ती कॉलनी रस्ता, जीवनबाग सोसायटी, अहिल्याबाई उद्यान, बंदावणे मळा, मेट्रो हॉटेलसमोर, चुंचाळे फाटा, अंबड लिंक रोड, ज्योती फार्म, अब्दुल ट्रेडर्स, सारस्वत बँकेसमोर, केवल टाकी रस्ता, संगम हॉटेलजवळ, एआर फर्निचर जवळ, बजरंगनगर रस्ता, खरोटे मेडिकल, नवश्या गणपती समोर, बॉबीज हॉटेल, सिरीन मिडोज, हॉटेल पक्वान, गंगापूर गाव, शिव हॉस्पीटलजवळ, म्हाडा इमारतीलगत त्र्यंबक रोड, पपया नर्सरी चौक, अशोकनगर, जाधव संकूल, फाशीचा डोंगर.

Tendernama
www.tendernama.com