Nashik: महापालिकेच्या Missing Links बाबतच्या प्रस्तावाला सरकारकडून प्रतिसादच नाही

मिसिंग लिंकच्या कामांसाठी महापालिकेकडून शासनाकडे हजार कोटींची मागणी
Nashik City, nmc, Kumbh
Nashik City, nmc, KumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक महापालिका हद्दीत २७ रस्त्यांची कामे सुरू असून, ते रस्ते पूर्ण झाल्यानंतर या महत्त्वाच्या रस्त्यांना तसेच मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या मिसिंग लिंकची कामे भूसंपादनासह इतर कारणांमुळे अपूर्ण आहेत.

Nashik City, nmc, Kumbh
Nitin Gadkari: नागपूर मेट्रोबाबत मंत्री गडकरींनी काय दिली गुड न्यूज?

या मिसिंग लिंकची कामे सिंहस्थाच्या प्राधान्यक्रमात येत नसल्याने कुंभमेळा प्राधिकरणच्या अखत्यारित येत नाहीत. यामुळे महापालिकेने या मिसिंग लिंकच्या कामांसाठी शासनाकडे हजार कोटींची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला. मात्र, सरकारकडून त्याबाबत काहीही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेलाच आता ही कामे करावी लागणार आहेत. या मिसिंग लिंकसाठी भूसंपादनाचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या पर्यायाचा वापर करणार आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Mumbai: रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगद्यांवर MMRDA खर्च करणार तब्बल 48 हजार कोटी

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक शहरात जवळपास दहा हजार कोटींची कामे सुरू आहेत. महापालिकेने सिंहस्थ आराखड्यात २४०.५५ किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित केले होते. मात्र, कुंभमेळा प्राधिकरणाने त्यातील अवघ्या ११७ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी दिली आहे.

महापालिका हद्दीत २७ रस्त्यांची कामे सुरू असून या रस्त्यांसाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून जवळपास १३०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मात्र, हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर या महत्त्वाच्या रस्त्यांना तसेच मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या मिसिंग लिंकच्या अपूर्ण कामांबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.

Nashik City, nmc, Kumbh
राज्याच्या ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी वाढणार; रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी...

शहरातील या १९ मिसिंग लिंकच्या कामांना निधी देण्याबाबत सरकार काहीही निर्णय कळवत नसल्याने महापालिकेनेच ही कामे करण्याची तयारी सुरू केली आहे. या मिसिंग लिंकच्या रस्त्यांची लांबी १५.५ किलोमीटर असून त्यासाठी महापालिकेसा हजार कोटींची गरज आहे. महापालिकेकडे निधीची कमतरता असल्याने मिसिंग लिंकसाठी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून भूसंपादन करून रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे.

शहरात १९ मिसिंग लिंक 

विकास आराखड्यातील रस्ते कंसात (मिसिंग लिंक)

कपिला संगम-जय शंकर लॉन्स-नांदूर दसक (जय शंकर फेस्टिव्हल ते नांदूर दसक शिव रस्ता,६२९ मीटर)

ट्रॅक्टर हाऊस ते नांदूर दसक गाव     (कोठावळे ट्रेडिंग ते टाकळी एसटीपी, ६१६ मीटर)

टाकळी फाटा ते गांधीनगर प्रेस     (गीताईनगर घरकुल,२५४ मीटर)

संगम पुल ते टाकळी एसटीपी-मरी माता मंदिर    (टाकळी एसटीपी-तिरुपतीनगर- वैभव लक्ष्मी लॉन्स, ४८३ मीटर)

Nashik City, nmc, Kumbh
कोपरगाव-मालेगाव मार्गावर येवल्यात उड्डाणपूल नको; बायपास करा

उपनगर नाका-इच्छामणी गणपती- निलगिरी बाग-आरटीओ इच्छामणी शाळा- मकरंद कॉलनी ते घाडगे मळा (बादशहा मार्ग, ७६८ मीटर)

मखमलाबाद गाव-गंधारवाडी-जेहान सर्कल (मखमलाबाद गाव- कॅनॉल लगत, १५९५ मीटर)

पपया नर्सरी- दत्तमंदीर चौक-अंबड-पाथर्डी  (अंबड गाव- वडनेर रोड,२२९७ मीटर)

सौभाग्यनगर-बिटको-जेलरोड-नांदूर गाव जत्रा हॉटेल   ( उद्धव मेमोरिअल ते म्हसरुळ आडगाव लिंक रोड पर्यंत,२१६८ मीटर)

लेखानगर-कलानगर चौक-वडाळा गाव-उपनगर (रोकडोबावाडी ते विहीतगाव, ५७० मीटर)

मखमलाबाद-मातोरी रोड-फॉरेस्ट नर्सरी-केबीटी सर्कल (दरी-मातोरी रोड ते बादशहा मार्ग, ८३५ मीटर)

नवशा गणपती ते वृंदावन लॉन्स (वृंदावन लॉन्स ते आनंदवली गाव, ८९३ मीटर)

शरणपूर पोलिस चौकी सिग्नल-रिमांड होम (आरडी सर्कल मिलिंदनगर,२२२ मीटर)

बारदान फाटा-सुला वाईन चौक-अंबड लिंक रोड (सुला चौक ते अंबड लिंक रोड, ११९१ मीटर)

मीनाताई ठाकरे क्रिडा संकुल ते अक्षता मंगल कार्यालय  (पांजरपोळ ते रासबिहारी रोड, ३०३ मीटर)

हिरावाडी ते एनआयटी कॉलेज (हिरावाडी-एनआयटी कॉलेज,३९२ मीटर)

एनआयटी पॉलिटेक्निक ते औदुंबर मंगल कार्यालय (  औदूंबर मंगल कार्यालय, १९८ मीटर)

एनआयटी - हिरावाडी कॅनॉल-गुंजाळबाबा मळा ( एनआयटी पॉलिटेक्निक - हिरावाडी कॅनॉल, ५२७ मीटर)

जलशुद्धीकरण केंद्र-शिवाजीनगर चौक (शिवाजीनगर ते कानेटकर उद्यान, ११०९ मीटर)

कानेटकर उद्यान ते मोतीवाला कॉलेज (कानेटकर उद्यान, ५४० मीटर)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com