Nashik : नाशिककरांसाठी चांगली बातमी! सिटीलिंकच्या संपावर अखेर कायमस्वरुपी तोडगा

citylink
citylinkTendernama

नाशिक (Nashik) : वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या कारणामुळे सिटीलिंकचे (Citylink) कर्मचारी वारंवार संप करीत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (NMPML) बस वाहक पुरवण्यासाठी अखेरीस दुसऱ्या पुरवठादारासही कार्यारंभ आदेश दिले आहेत.

नागपूरस्थित युनिक या कंपनीला सिटीलिंकच्या नाशिककरोड विभागासाठी वाहक पुरवण्याचे काम दिले असून या कंपनीने ५० वाहक पुरवलेही आहेत. आधीच्या ठेकेदाराची मुदत चार महिन्यांनी संपणार असून, त्यानंतर हा ठेकेदार १८० वाहक पुरवणार आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळाने अनेक महिन्यांपासून सुरू केलेली ही प्रक्रिया अखेरीस जानेवारीमध्ये पूर्ण झाली असून आता वाहकांनी अचानक संप पुकारल्याने होत असलेल्या गैरसोईतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

citylink
Nashik : डीपीसीच्या पुनर्विनियोजनातील निधीकडे का लागल्या आमदार, ठेकेदारांच्या नजरा?

नाशिक महापालिकेने जुलै २०२१ मध्ये महानगर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत सिटीलिंक शहर बससेवा सुरू केली. सिटीलिंक बससेवा पंचवटी आणि नाशिकरोड अशा दोन डेपोतून नाशिककरांना सेवा देते. या सेवेसाठी वाहक पुरवण्यासाठी या दोन्ही विभागांना स्वतंत्र एक याप्रमाणे दोन ठेकेदार नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार एका ठेकेदाराला अधिकाधिक ४०० वाहक पुरवण्याची मर्यादा ठरवूनही दिली होती. सुरवातीला वाहकांची संख्या कमी असल्याने एकाच ठेकेदाराकडून दोन्ही डेपोंसाठी वाहक घेतले जात होते.

दरम्यान शहर बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सिटीलिंकने त्याच ठेकेदाराकडून ५५० वाहकांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागील दोन वर्षांत या वाहकांनी जवळपास सातवेळा आंदोलन केले व अचानकपणे झालेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन सिटीलिंक बससेवेची प्रतिमा मलीन झाली. यामुळे दोन्ही डेपोंसाठी दोन स्वतंत्र पुरवठादारांची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

citylink
Nashik : 333 कोटींच्या दायित्वाचा हिशेब द्या; उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका

यामुळे वाहकांनी संप पुकारल्यास किमान पन्नास टक्के बससेवा सुरू राहील, हा यामागील हेतु आहे. त्यानुसा सिटीलिंक कपंनीने डिसेंबर २०२२ मध्ये निर्णय घेत टेंडर प्रक्रिया राबवली. महापालिकेच्या नेहमीच्या खाक्यानुसार ही प्रक्रिया वर्षभर चालली. त्यात नागपूर येथील युनिक कंपनी त्यास पात्रही ठरली. मात्र, या कंपनीकडून एक कोटी रुपये अनामत रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कार्यारंभ आदेश लांबले. अखेरीस या कंपनीने जानेवारीमध्ये अनामत रक्कम भरल्यानंतर त्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत.

citylink
Mumbai : अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट बरोबर राज्य सरकारने का केले करार?

नवीन पुरवठादार नाशिकरोड बस डेपोतून सुटणाऱ्या सुमारे शंभर सिटी बससाठी १८० वाहक पुरवणार आहे, तर जुना पुरवठादारा तपोवन बस डेपोतून सुरू होणाऱ्या १५० सिटी बससाठी २३५ वाहक पुरवठा सुरूच ठेवणार आहे. दरम्यान या नवीन पुरवठादाराने आतपर्यंत ५० वाहक पुरवले असून आधीच्या ठेकेदार कंपनीची मुदत चार महिन्यांनी संपणार असून त्यानंतर उर्वरित वाहक पुरवण्याचे काम करणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com