Nashik : 90 मीटर शिडीची खरेदी फसल्यानंतर आता महापालिकेचा फायर रोबो खरेदीचा विचार

Fire Bridge
Fire BridgeTendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी खरेदी निर्णय रद्द केल्यानंतर आता फायर रोबोट खरेदी करण्याची चाचपणी सुरू केली आहे. फ्रान्सच्या कंपनीने नुकतेच बॅटरीवर चालणाऱ्या या फायर रोबोटचे प्रात्यक्षिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात सादर करण्यात आले.

Fire Bridge
Pune Nashik Expressway : असा असेल पुणे - नाशिक द्रुतगती प्रवास! पहा काय काय बदलणार?

नाशिक शहरातील गगनचुंबी इमारतींवरील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने फिनलॅण्डच्या कंपनीकडून ९० मीटर उंचीच्या अग्निशमन शिडीसाठी कार्यारंभ आदेश दिले. मात्र, या डबघाईस निघालेल्या कंपनीकडून शिडी पुरवठा होणार नसल्याचे स्पष्य झाले आहे. यामुळे सध्या अग्निशमन विभागाकडील ३० मीटरच्या शिडीलाच मुदतवाढ मिळवून काम भागवले जात असतानाच महापालिकेने फ्रान्सच्या कंपनीकडून रिमोटवर चालणारे फायर रोबोट खरेदी करण्याची चाचपणी सुरू केली आहे.

औद्योगिक वसाहतीतील रसायन कंपन्या तसेच तळघरांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना, गॅसगळतीमुळे लागणाऱ्या आगी, इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे फायर रोबोट उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन कर्मचाऱ्यांना उद्भवणारा धोका फायर रोबोटमुळे टाळता येऊ शकतो, असा अग्निशमन विभागाचा दावा आहे. या प्रात्यक्षिकाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त व विजयकुमार मुंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी आदी उपस्थित होते.

Fire Bridge
Ajit Pawar : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला अजितदादा गती देणार का?

असा आहे फायर रोबोट
-
रोबोटवरचा वॉटर मॉनिटर सुमारे ६० मीटरपर्यंत पाणी, कार्बनडाय ऑक्साईड फेकू शकणार आहे
- हा फायर रोबोट इमारतीचा जिनादेखील चढू शकतो.
- रोबोटिक यंत्राचे ब्रेक हे इलेक्ट्रोमॅग्नेटीक आहेत.
- प्रकाश योजनेसाठी एलइडीचीही सुविधा आहे.
- थर्मल इमेजिंग कॅमेरा असून रिमोटद्वारे पाचशे मीटर अंतरापर्यंत हे मानवरहित यंत्र कामगिरी करू शकते.
- एका चार्जिंगमध्ये किमान बारा तास रोबो चालवता येते.
- एक बॅटरी स्टॅन्डबाय ठेवण्याची सुविधा असल्याने यंत्राद्वारे सलग २४ तास आग विझविण्याची क्षमता आहे.
- बॅटरी चार्जिंगसाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो.
- रोबोट ८०० अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमानातही काम करू शकतो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com