Nashik : राष्ट्रीय युवा महोत्सवाचा 35 कोटींचा खर्च महापालिकेच्याच तिजोरीतून; राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळेना

Narendra Modi
Narendra ModiTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक येथे जानेवारी झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने नाशिक महापालिकेने शहर सुभोभिकरण व काही पायाभूत सुविधांसाठी ३५ कोटी रुपये खर्च केले.

कामे करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे कोणत्याही टेंडरशिवाय ३५ कोटींची कामे करण्यात आली. या कामांना कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार होती. तसेच या कामांच्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून केली जाऊ शकते, या अंदाजामुळे ठेकेदारांनीही होऊ दे खर्च या भावनेतून अव्वाच्या सव्वा दर लावून कामे केली. महापालिकेने या खर्चाच्या रकमेची राज्य सरकारकडे मागणी केली. मात्र, दोन महिने उलटूनही राज्य सरकारकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

तसेच आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे सरकारकडून निधी येण्याची शक्यता धुसर होत चालली असून आता महापालिकेच्याच तिजोरीतून या ठेकेदारांची देयके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीवरच या ३५ कोटींचा बोजा पडणार आहे.

Narendra Modi
Mumbai : 700 एसी डबलडेकर ई-बसेसचा पुरवठा करण्यास 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीचा नकार?

नाशिक शहरात जानेवारीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव झाला. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील हजारो युवक नाशिकमध्ये येणार असल्याने शहराचे ब्रॅण्डिंग करण्याची संधी म्हणून या महोत्सवाकडे बघितले गेले. 

यामुळे महापालिकेकडून शहर सजवण्यात आले. दुभाजकांची रंगरंगोटी व सुशोभीकरण, तपोवन परिसरात पार्किंग उभारणे, महोत्सवाच्या ठिकाणी जमीन सपाटीकरण करणे, पुलांची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, रिंगरोडचे अस्तरीकरण करणे, दिशादर्शक फलक, कॅटआय बसवणे, थर्मोप्लास्टिक पेंट मारणे, रोड मार्कर, साइन बोर्ड बसवणे, गोदाघाट डागडुजी व रंगरंगोटी करणे, वस्त्रांतर गृह दुरुस्ती व डागडुजी करणे, सभास्थळी बॅरेकेडिंग, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व स्वच्छता करणे, काळाराम मंदिरात मंडप, पडदे, ग्रीन कार्पेट टाकणे, मंदिरासमोरील उद्यानाची दुरुस्ती, शहरातील भिंतीवर रामायणाचे देखावे रेखाटणे, महत्त्वाच्या रस्त्याचे अस्तरीकरण, खडीकरण, फुटपाथ दुरुस्ती व सजावट अशी विविध कामे करण्यात आली. साधारणतः या कामांवर पस्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आला.

Narendra Modi
Nashik : रोजगार हमीच्या 60:40चे प्रमाण बिघडण्यास जबाबदार कोण? मंत्री की अधिकारी?

महापालिकेचे कोणतेही काम द्यायचे असल्यास त्याची टेंडर प्रक्रिया राबवली जाते.  मात्र, राष्ट्रीय युवा दिनाच्या अगदी पंधरा दिवसच यंदाचा युवा महोत्सव नाशिकला होणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ही कामे करण्यापूर्वी टेंडर प्रक्रिया राबवून पुरवठादार, ठेकेदार नियुक्त करणे शक्य नव्हते. यामुळे महापालिकेच्या विभागांनी कामे वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य दिले व त्या कामांना महासभेवर कार्योत्तर मंजुरी घेण्याचा निर्णय घेतला.

ही कामे करताना निधी नसल्याने ही कामे ठेकेदारांना त्यांच्याच खर्चाने कामे करावी लागणार असल्याने व देयके कधी मिळणार याचीही खात्री नसल्याने त्यांनी अव्वाच्या सव्वा दर लावून ही कामे केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महापलिकेच्या सर्व विभागांना मिळून शहर सजावटीवर ३५ कोटी रुपये खर्च झाला आहे. घाईघाईने कामे करण्याच्या नावाखाली कंत्राटदारांनी नववर्षाच्या सुरवातीलााच दिवाळी साजरी केल्याचे बोलले जात आहे.

Narendra Modi
Nashik ZP : जिल्हा परिषदेत ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन कामाचा वाढला वेग; 8 दिवसांत 24 कोटींची देयके तयार होऊन मंजूर

या खर्चाला महासभेने कार्योत्तर मंजुरीही दिली आहे व सरकारने महापालिकेला या खर्चाची प्रतिपूर्ती करून द्यावी, असे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. पत्र पाठवून दोन महिने उलटूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. यामुळे शासनाने खर्च देण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे.

त्यात आर्थिक वर्ष संपल्याने नवीन आर्थिक वर्षात निधी मिळण्याची शक्यता नसल्यामुळे हा सर्व खर्च मनपाने स्वतःच्या तिजोरीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या विभागांनी अक्षरश: उधळलेल्या निधीचा बोजा आता सामान्य करदात्यांवर पडणार असल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com