Nashik : MSRDC करणार बाह्य रिंगरोडचे काम; महापालिकेचे सर्वेक्षण थांबवले

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुष्टीने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व बाहेरच्या शहरांना जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळवण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेला ६० किलोमीटरच्या रिंगरोडचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा कारभार आल्यानंतर त्यांनी बैठक घेऊन हा रिंगरोड एमएसआरडीसी उभारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता एमएसआरडीसीने महापालिकेकडून सुरू असलेले रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे  काम थांबवून स्वता: सुरू केले आहे. या रिंगरोडसाठी साधारण दहा हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Nashik
Thane : कंत्राटी बस वाहकांचा अर्धा पगार खाणारे बोके कोण?

नाशिक महापालिकेने २०१५ च्या सिंहस्थात नव्वद किलोमीटरचा अंतर्गत रिंगरोड विकसित केला होता. मात्र, शहराच्या वाढत्या विस्तारामुळे तो अपुरा पडू लागला आहे. यामुळे आगामी सिंहस्थात साठ किलोमीटर बाह्य रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेत तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांन मागील वर्षी रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. बांधकाम विभागाने नाशिकच्या चारही बाजूने असलेल्या महामार्गांवरील वाहतूक नाशिक शहराबाहेरून वळवण्यासाठी ६० किलोमीटर लांबीचा रिंगरोडचा प्रस्ताव तयार केला. हा बाह्य रिंगरोड साधारण ६० किमी लांबीचा होणार असून त्याची रुंदी ३० ऐवजी ६० मीटर करण्याचे निश्चित करण्यात आले. या रिंगरोडसाठी साधारण १० हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याने यासाठी राज्य सरकारकडून मदत मागण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचाही निर्णय झाला.

Nashik
Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी Good News! 'या' प्रकल्पाच्या जागेसाठी 108 कोटी जमा

या रिंगरोडसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना टीडीआरच्या रुपात मोबदला देण्याबाबतही चर्चा झाली व नगररचना विभागाने तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवला होता. दरम्यान महापालिकेने या रिंगरोडसाठी सर्वेक्षणाचे काम सुरू केले असतानाच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडील मंत्रालयाचा खातेपालट होऊन त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आली. त्यांनी तातडीने नाशिकच्या बाह्यरिंगरोडचा विषय हाती घेऊन तो मार्ग एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांच्या विभागाला दिल्या. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुर असतानाच एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सर्वेक्षण करणार्या पथकाला सर्वेक्षणाचे काम थांबवण्यास सांगितले आहे. या रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम यापुढे एमएसआरडीसी करणार असल्याचे नगर रचना विभागानेही स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला, महापालिकेची आर्थिक स्थिती, सरकारकडून मदत मिळवणे आदी बाबींमधून महापालिकेची मुक्तता झाली आहे.

प्रस्तावित बाह्य रिंग रोड
• नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रोड
• सातपूर-अंबड लिंक रोड
• गंगापूर- सातपूर लिंक रोड
• बिटको विहीतगाव-देवळाली रोड

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com