Thane : कंत्राटी बस वाहकांचा अर्धा पगार खाणारे बोके कोण?

agitation
agitationTendernama

मुंबई (Mumbai) : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) परिवहन उपक्रमातील ३५० कंत्राटी बस वाहकांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संपाचे हत्यार उपसले. या संपामुळे टीएमटीच्या १०० बसगाड्या जागेवर उभ्या होत्या.

agitation
EXCLUSIVE : आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोप केलेले चंद्रकांत गायकवाड आहेत तरी कोण?

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुमारे २२ हजार रुपये वेतन आहे. त्यापैकी १० ते ११ हजार रुपयेच त्यांच्या हातात मिळतात. याच्या निषेधार्थ गेल्या महिनाभरापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर प्रशासनाकडून दोन वेळा आश्वासन देण्यात आले. कपात होत असलेल्या पगाराबाबत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखवले आणि प्रशासनाने कंत्राटदाराकडे बोट दाखवले. त्यामुळे पगार गायब होतो कुठे? या संभ्रमात कर्मचारी आहेत. तसेच याबाबत प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही आणि ठोक पगाराबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

agitation
BMC ऍक्शन मोडवर; मुंबईतील 'या' ऐतिहासिक वारसास्थळांचा होणार मेकओव्हर

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूकीसाठी प्रवाशांकडून टीएमटी बसगाड्यांचा वापर सर्वाधिक होतो. टीएमटीमध्ये कंत्राटी पद्धतीने वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोख वेतन मिळावे, महापालिकेने ठरवलेले वेतन मिळावे, थकबाकी मिळावी अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत. यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. प्रशासनाकडून ठोस उत्तरे मिळत नव्हती. यामुळे त्यांनी शुक्रवार पहाटेपासून संपाचे हत्यार उपसले. या संपात २३५ पुरुष तर १२५ महिला बस वाहकांनी सहभाग घेतला. त्यामुळे परिवहन सेवेवर परिणाम झाला आहे.

agitation
Mumbai : तब्बल 90 कोटींचे वादग्रस्त टेंडर भोवले; 'या' अधिकाऱ्याची तडकाफडकी...

परिवहन सेवेच्या तीनशे बसगाड्या दररोज प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होतात. परंतु संपामुळे शंभर बसगाड्यांची वाहतूक बंद होती. आधीच प्रवासी संख्येच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आणि त्यात संपामुळे जेमतेम २०० बसगाड्या रस्त्यावर होत्या. यामुळे स्थानक परिसरातील सॅटीस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. टीएमटीच्या शहरातील इतर बस थांब्यावरही प्रवाशांची गर्दी झाली होती. घोडबंदर भागातील प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. बसगाड्या वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. महिला प्रवाशांना त्याचा फटका बसला. टीएमटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबत विनंती करत होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com