Nashik : उत्पादन दुप्पट करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्राची 700 कोटींची गुंतवणूक

Uday Samant
Uday SamantTendernama

नाशिक (Nashik) : महिंद्रा अँड महिंद्राच्या नाशिक प्रकल्पात उत्पादन दुप्पट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी मागील सहा महिन्यांत सुमारे ७०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करीत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या नवीन प्रकल्पाच्या आराखड्यास उद्योग विभागाकडून मंजुरी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी विस्तारीकरणासाठी नवीन आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, या गुंतवणुकीत आणखी शेकडो कोटींची वाढ होणार असल्याचे संकेत उद्योग विभागातील मंत्रालय स्तरावरील अधिकारी तसेच 'महिंद्रा'चे कॉर्पोरटचे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Uday Samant
Mumbai : वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी 74 कोटींचा सल्लागार

या वर्षाच्या सुरवातीला दाओस येथे झालेल्या सामंजस्य करारानुसार महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचा दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रिकलचा प्रकल्प पुण्यात होणार  असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे नाशिक येथील महिंद्राच्या प्रकल्पाबाबत उलट सुलट चर्चा झाल्या होत्या. याबाबत नाशिकच्या आमदारांनी विधानसभेत उद्योगमंत्र्याना प्रश्न विचारले होते. त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महिंद्राच्या नाशिक प्रकल्पाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. या विस्तारीकरणासाठी अडीच ते पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती दिली होती. महिंद्रा कंपनी पुण्याप्रमाणे नाशिकमध्येही गुंतवणूक करणार असून महिंद्रा कंपनी विस्तारीकरणासाठी अडीच ते पाच हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. 

Uday Samant
Mumbai Metro-3: 'टनेलिंग प्रोजेक्ट' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह' पुरस्काराने गौरव

मंत्री सामंत यांनी सांगितले होते की, महिंद्राचे दोन प्रकल्प असून नाशिकमधील प्रकल्पाचे देखील विस्तारीकरण होणार आहे. तेथे अडीच ते पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे. त्या करारानुसार 'महिंद्रा अँड महिंद्राने तीन महिन्यांपासून नाशिक प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. यात प्रामुख्याने नवीन पेंट शॉप, नवीन कन्व्हर लाइन, संशोधन विभाग आदींमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अद्ययावत इमारत साकारण्यात येत आहे. यामुळे नाशिक प्रकल्पाच्या क्षमतेत दुपटीने वाढ होणार आहे. एमआयडीसीने गेल्या काही महिन्यांपासून 'महिंद्रा अँड महिंद्रा'च्या नाशिक प्रकल्पात सुमारे पाच लाख चौरस मीटरपेक्षा जास्त अतिरिक्त बांधकामाला परवानगीदिली आहे. मागणीप्रमाणे नियमानुसार परवानगी दिली जाईल, असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. या बाबींवरून महिंद्रा अँड महिंद्रा नजीकच्या काळात नाशिक प्रकल्पात अडीच हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com