Mumbai Metro-3: 'टनेलिंग प्रोजेक्ट' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह' पुरस्काराने गौरव

Mumbai
MumbaiTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) ला 'टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि ईअर' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि ईअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस अवॉर्ड्स २०२३ मध्ये प्रतिष्ठित अशा टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) द्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Mumbai
सरकारकडे दहा हजार कोटींची बिले थकल्याने ठेकेदार आक्रमक; 27 नोव्हेंबरपासून...

मुंबई येथे आयोजित "टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेसमध्ये हवामानातील लवचिकता आणि टिकाऊपणा" या विषयावर सुरू असलेल्या टनेलिंग एशिया २०२३ आंतरराष्ट्रीय परिषदेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मा. श्री. हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. आयटीए टनेलिंग अवॉर्ड्स २०२३ चे हे नववे वर्ष आहे.

Mumbai
Mumbai BEST : धक्कादायक! बेस्टच्या सगळ्याच बस गाड्या निघणार भंगारात; कारण काय?

"टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर श्रेणीमध्ये पुरस्कार मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. गजबजलेल्या भागातून मार्ग काढणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, स्थानिकांचे पुनर्वसन करणे, समुद्रकिनार्‍याजवळ बोगदे बांधणे तसेच पाण्याखालून भुयारी मार्ग काढणे, यांसारख्या अनेक आव्हानांना या प्रकल्पादरम्यान सामोरे जावे लागले. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्याने ही आव्हाने यशस्वीरित्या पेलता आली", अशी प्रतिक्रिया मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक, अश्विनी भिडे यांनी दिली.

Mumbai
Mumbai : नाताळची भेट; विश्वविक्रमी समुद्री सेतू 25 डिसेंबरला खुला होणार?

"इमारत व त्यातील रहिवाशांची, शहरवासीयांची तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आणि रचनात्मक अखंडता निश्चित करताना हा प्रकल्प राबविणे हे आमच्यासाठी नेहमीच प्रथम प्राधान्य राहिले आहे. गेल्या ७ वर्षातील २५० दशलक्ष तासामागे कामगारांना कामाच्या ठिकाणी दुखापत होण्याचा सरासरी दर ०.३४ इतका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांमधील दुखापतीच्या घटनांच्या सरासरी दर ०.५ च्या मानाचे खूपच कमी आहे", असे यावेळी मुं.मे.रे.कॉ. चे संचालक (प्रकल्प) सुबोध गुप्ता म्हणाले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com