नाशिककरांसाठी खूशखबर; इंडिगोची एक जूनपासून 29 शहरांना विमानसेवा

Nashik Airport Ozar
Nashik Airport OzarTendernama

नाशिक (Nashik) : विस्कळीतपणामुळे कायम चर्चेत असलेल्या नाशिक येथील विमानसेवेचा वनवास संपवण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. इंडिगोने नाशिकमधून विमानसेवेचा विस्तार करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे १ जूनपासून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार देशातील महत्त्वाच्या २९ शहरांना नाशिकहुन विमानसेवा सुरू होणार आहे. त्यात कोलकता, तिरुअनंतपुरम, वाराणसी, तिरुपती, बेंगळुरू, अमृतसर या धार्मिक शहरांचाही समावेश करण्यात आला आहे.

Nashik Airport Ozar
मुंबईत पावसाळापूर्व खड्डे भरण्यासाठी 84 कोटी; चौरस मीटरला 4000 ₹

नाशिकच्या ओझर विमानतळावरून गेल्या काही वर्षांपासून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. ही विमानसेवा नियमित चालण्याऐवजी कायम विस्कळीत असल्याचीच चर्चा अधिक होत असते. त्यात मागील वर्षी केंद्र सरकारच्या उडाण योजनेची मुदत संपल्यानंतर एका कंपनीची दिल्ली विमानसेवा विस्कळीत झाल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यात मे मध्येही दिल्ली विमानसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना शिर्डी विमानतळाचा आधार घ्यावा लागत आहे. नाशिकहून पूर्णक्षमतेने विमानसेवा सुरू होणार की नाही, याबाबत नकारात्मक चर्चा होत असते. या सर्व पार्श्वभूमीवर इंडिगो कंपनीने नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकात नाशिकहून देशातील २९ शहरांना विमानसेवा उपलब्ध केली आहे.

Nashik Airport Ozar
Mumbai : 'BKC'तील 3 हजार कोटींच्या भूखंडांसाठी टेंडर

या शहरांना विमानसेवा

अहमदाबाद, नॉर्थ गोवा, इंदूर, हैदराबाद, नागपूर, अमृतसर, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकता, कोझिकोड, लखनौ, मेंगलुरु, रायपूर, राजमुंद्री,रांची, तिरुअनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, विजयवाडा या शहरांचा समावेश केला आहे. एकाच वेळी दररोज २९ शहरांना जोडणारी विमानसेवा प्रथमच सुरू होत आहे. आतापर्यंत अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली या शहरांना जोडणारी सेवा सुरु होती. आता त्यात नवीन शहरांची भर पडल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. विशेष करून आयटी तसेच नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला या निमित्ताने चालना मिळणार आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या प्रवाशांना देखील या निमित्ताने पर्याय निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com