नाशिककरांसाठी Good News; केंद्राकडून 'या' मोठ्या प्रकल्पाची घोषणा

PM Narendra Modi
PM Narendra ModiTendernama

नवी दिल्ली (New Delhi) : देशात द्वितीय श्रेणी (टियर २) शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रोलाईट, निओ मेट्रो (Metro Neo) आणि रॅपीड मेट्रो या नव्या मेट्रो प्रकल्पांवर केंद्र सरकारने भर दिला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील नाशिकमध्ये (Nashik) रस्त्यावर चालणाऱ्या निओ मेट्रोचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

PM Narendra Modi
देशात नागपूरचाच वाजणार डंका! ...असे का म्हणाले Devendra Fadnavis?

ही माहिती पंतप्रधान कार्यालयातर्फे (PMO) नुकतीच देण्यात आली. देशात सार्वजनिक वाहतुकीसाठी दिल्ली, मुंबई, कोलकता, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. नाशिकमध्ये निओ मेट्रोला ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टीमद्वारे चालणारे रबरी टायर असलेले इलेक्ट्रिक डबे असतील. इलेक्ट्रीक ट्रॉली बस सारखी दिसणारी ही मेट्रो रस्त्यावर धावणारी असेल आणि त्यासाठी मेट्रो रेल्वेप्रमाणे विशिष्ट गेजच्या लोहमार्गाची आवश्यकता नसेल.

मेट्रो लाइट ही कमी खर्चाची आणि गर्दीच्या वेळेत अधिकाधिक प्रवाशांना वाहतूक सेवा देणारी व्यवस्था आहे. त्यात सुरक्षितता, वक्तशीरपणा, विश्वासार्हता जपण्यास प्राधान्य असून महानगरांव्यतिरिक्त मोठ्या शहरांसाठी आणि लहान शहरांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल.

PM Narendra Modi
CM: ...तर रस्त्यावरील खड्ड्यांना अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

पंतप्रधान कार्यालयाच्या दाव्यानुसार मेट्रो लाइट प्रकल्पाचा खर्च पारंपारिक मेट्रो यंत्रणेच्या तुलनेत केवळ ४० टक्के असून जम्मू, श्रीनगर आणि गोरखपूर अशा शहरांमध्ये या प्रकल्पाची आखणी केली जात आहे. प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टमअंतर्गत राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते मेरठ या दोन शहरांना जोडणारी जलद वाहतूक यंत्रणा विकसित केली जाणार आहे.

वॉटर मेट्रोचे कोचीत उद्‍घाटन
जलमार्गाने वाहतुकीसाठीच्या देशातील पहिल्या ‘वॉटर मेट्रोचे‘ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज केरळच्या कोची शहरात होत आहे. यासाठी २४ टर्मिनल उभारण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com